शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकलपूर मार्गावर जाणे नको रे बाबा... वाघ आहे वाघ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

देसाईगंज तालुक्यातील वन विभाग कार्यालयाच्या मागील परिसर ते वळूमाता प्रक्षेत्र या परिसरात जंगल आहे. मागील आठवड्यात लाखांदूर  जंगल परिसरातून स्थलांतरित झालेला पट्टेदार वाघ या परिसरात दिसून आल्यानंतर वन विभागाने लागलीच यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, याच काळात पुन्हा दुसरा पट्टेदार वाघ दिसल्याने देसाईगंज ते एकलपूर, कोरगाव, बोडधा मार्गावरून प्रवास करणे धोकादायक असल्याचे निदर्शनास येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यात  सध्या एकलपूर मार्गावर पट्टेदार वाघाचे रोजच दर्शन होत असल्याने या मार्गावर असणाऱ्या गावकऱ्यांना स्वगावी जाण्यासाठीही पेच निर्माण झाला आहे. हा मार्ग वाघाच्या अस्तित्वामुळे धोकादायक झाल्याने एकलपूर मार्गावर जाणे नको रे बाबा...! वाघ आहे, असे म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. देसाईगंज तालुक्यातील वन विभाग कार्यालयाच्या मागील परिसर ते वळूमाता प्रक्षेत्र या परिसरात जंगल आहे. मागील आठवड्यात लाखांदूर  जंगल परिसरातून स्थलांतरित झालेला पट्टेदार वाघ या परिसरात दिसून आल्यानंतर वन विभागाने लागलीच यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, याच काळात पुन्हा दुसरा पट्टेदार वाघ दिसल्याने देसाईगंज ते एकलपूर, कोरगाव, बोडधा मार्गावरून प्रवास करणे धोकादायक असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने बोडधा, कोरेगाव, एकलपूर येथील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. त्यांनी मार्ग बदलून प्रवास करावा, जेणेकरून कोणतीही जीवित हानी होणार नाही, असेही सुचविण्यात आले आहे. एकंदरीत एकलपूर मार्ग सध्यातरी दुचाकी, सायकलस्वार, पादचारी यांच्यासाठी   धोकादायक  ठरला  आहे.

 ५ ते ९ वाजेपर्यंत मार्ग बंद दरम्यान गुरुवारी एकलपूर वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाची संयुक्त बैठक एकलपूर या ठिकाणी उपसरपंच विजय सहारे, वनपरिक्षेत्राधिकारी विजय धांदे व गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात या मार्गाच्या आजूबाजूला, मार्गावर वाघ दिसून येत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकलपूरकडे जाणारा मार्ग हा पहाटे पाच ते सकाळी ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

 

टॅग्स :Tigerवाघ