शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

असहकार आंदोलन करणार

By admin | Updated: October 15, 2015 01:48 IST

२० सप्टेंबर २०१५ रोजी बिरसू आत्राम हा कामासाठी आलापल्लीत आला होता. गावाकडे परत जाताना सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात तो जखमी झाला.

अहेरी : २० सप्टेंबर २०१५ रोजी बिरसू आत्राम हा कामासाठी आलापल्लीत आला होता. गावाकडे परत जाताना सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात तो जखमी झाला. या घटनेसंदर्भात दोषी सीआरपीएफ पोलीस जवानांवर कारवाई करून जखमी आत्राम यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहेरी, एटापल्ली उपविभागातील आदिवासी बांधव असहकार आंदोलन करतील, असा एकमुखी ठराव मंगळवारी गट्टेपल्ली येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पारित करण्यात आला.मंगळवारी गट्टेपल्ली येथे गट्टेपल्लीच्या पोलीस पाटीलांच्या अध्यक्षतेखाली अहेरी, एटापल्ली उपविभागातील पेसाअंतर्गत येणाऱ्या गावांची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला युवक काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष संतोष आत्राम, ज्येष्ठ नेते सैनू गोटा, बोटनपुंडीचे माजी सरपंच चतनू मडावी, सुधाकर तिम्मा, रामजी कत्तीवार, दौलत दहागावकर आदी उपस्थित होते. २० सप्टेंबर २०१५ रोजी पेरमिली येथे एका हातगाडीवर नाश्ता करून गावाकडे परत जात असताना बिरसू आत्राम यांच्यावर जंगलात लपून बसलेल्या सीआरपीएफ जवानांनी कोणतीही चौकशी न करता गोळीबार केला. यात आत्राम हे जखमी झालेत. सुदैवाने आत्राम बचावले. या घटनेसंदर्भात सीआरपीएफ पोलीस जवान व पेरमिली पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची लेखी तक्रार जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्याकडे २३ सप्टेंबर रोजी करण्यात आली. या तक्रारीला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र या संदर्भात दोषी पोलिसांवर कोणतीही कारवाई झाली नाही. केंद्र व राज्य सरकार हे आदिवासींच्या जीवनाविरोधी भूमिका स्वीकारल्याने सरकारचा निषेध म्हणून असहकार आंदोलन पुकारण्याचे मंगळवारच्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आले. निरपराध बिरसू आत्राम यांना न्याय मिळवून देण्यासाठी १० नोव्हेंबरपासून सरकार विरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे ठरविण्यात आले. यावेळी गट्टेपल्ली येथील दलसू मडावी, झुरू मडावी, बाबुराव मडावी, मंगू मडावी, पोचा मडावी, विजय मडावी, बिरसू आत्राम आदींसह मोठ्यासंख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)