शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा मोर्चा वडसा एसडीओ कार्यालयावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 01:06 IST

डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात देसाईगंज तालुक्यातील डॉक्टर संघटनेने उपविभागीय अधिकारी

हल्ल्यांचा केला निषेध : तत्काळ पाऊल उचलण्याची मागणीदेसाईग्ांज : डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात देसाईगंज तालुक्यातील डॉक्टर संघटनेने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरूवारी मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे यांना निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध करण्यात आला. शासनाने डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी तालुका डॉक्टर असोसिएशनने यावेळी केली. शुल्लक कारणावरून रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात सद्य:स्थितीत ५३ निवासी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे रूग्णालयाचे वातावरण भितीदायक झाले आहे. डॉक्टरांना देखील रूग्णांना तपासण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रभावी पाऊल उचलण्यात आले नसल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. डॉक्टरांच्या आतापर्यत कोर्टात असलेल्या प्रलंबीत प्रश्नांबाबत सरकारने गंभीर दखल घ्यावी. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आदी मागण्यांचे निवेदन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. मोर्चात डॉक्टर असोसिएशन देसाईगंजचे अध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील, सचिव डॉ. एम. एस. पटले, डॉ. सोहेल सामी, डॉ. हितेश जुमनाके, डॉ. अनिल नाकाडे, डॉ. मनिष भुसारी, डॉ. रवी मोटवानी, डॉ. आय. एन. टुटेजा, डॉ. चंद्रकांत नाकाडे, डॉ. महेश पापडकर, डॉ. एम. पी. सरकार, डॉ. के. वाय. बार, डॉ. सुर्यभान गभने, डॉ. चेतन नाकाडे, डॉ. विनोद नाकाडे, डॉ. पराग पांडव, डॉ. श्रीकांत बन्सोड, डॉ. जे. आर. भगत, डॉ. मिनाक्षी बुध्दे, डॉ. अमोल बुध्दे, डॉ. उमेश राउत, डॉ. संतोष खांडेलवाल आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)काळ्या फिती लावल्याहल्ल्याचा निषेध करण्यासाठी काळ्या रंगाच्या फित लावून डॉक्टर असोसिएशन देसाईगंजच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सर्व खाजगी डॉक्टरांनी दिवसभर रूग्णालय बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. मात्र गंभीर रूग्णांसाठी दवाखाने सुरू करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.