अन्याय : माध्यमिक शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खासगी शाळांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांची विनाकारण वेतनवाढ रोखली जात आहे. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असून वेतनवाढीसह बिले सादर करावी, अशी मागणी शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षा लादण्यासारखा कोणताही अपराध न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी थांबविल्या जात आहेत. वेतनवाढ न लावलेली देयके वेतन पथकात स्वीकारली जातात व ती पारितही केली जात आहे. आजपर्यंत असे अनेक प्रकरणे घडली असून कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागली आहे. अशी प्रकरणे पुन्हा उद्भवू नये, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना ताकीद द्यावी, जुलै २०१७ चे वेतन देयक वेतनवाढ लागू केल्याशिवाय स्वीकारणार नाही, असा इशाराही दिला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह अजय लोंढे यांच्यासह सुधाकर अडबाले, दत्तात्रय खरवडे, कैलास भोयर, सुरेंद्र मामीडवार, दिलीप गडपल्लीवार, रामदास टिकले, सुदाम ढगे, यादव बानबले, संजय खांडरे, अरविंद उरकुडे, बांबोळे, रामटेके, देशमुख, मनोज निंबार्ते उपस्थित होते.
विनाकारण वेतनवाढ रोखू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 02:28 IST