शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी उठल्यानंतरही मुलांना घराबाहेर साेडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

काेराेनाच्या पहिल्या लाटेत केवळ वृद्ध नागरिकांनाच सर्वाधिक त्रास झाला. यात काही जणांना जीवही गमवावा लागला हाेता. तरुण मात्र लवकरच ...

काेराेनाच्या पहिल्या लाटेत केवळ वृद्ध नागरिकांनाच सर्वाधिक त्रास झाला. यात काही जणांना जीवही गमवावा लागला हाेता. तरुण मात्र लवकरच बरे हाेत हाेते. दुसऱ्या लाटेने मात्र तरुणांनाही चांगलेच जेरीस आणले. वृद्ध नागरिकांसह तरुणांचाही जीव गेला आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण केली आहे. काेराना नावाचा राेगच नाही, हा तर केवळ दैनंदिन सर्दी, ताप, खाेकला आहे, असे म्हणणारे नागरिकही दुसऱ्या लाटेतील मृतकांचा आकडा बघून सावधगिरी बाळगायला लागले.

दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाल्यांनतर शासनाकडून संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. अशा स्थितीत आजपर्यंत घरात असलेल्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याची पालकांची इच्छा हाेते. मात्र नाेव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात आणखी तिसरी लाट येण्याची शक्यता साथराेगाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत त्यांना घराबाहेर काढणे धाेक्याचे ठरू शकत असल्याने पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

बाॅक्स

लहान मुलांमध्ये आढळलेली लक्षणे

-काेराेनाची सामान्य लक्षणे असलेली सर्दी, ताप, खाेकला हीच लक्षणे दुसऱ्या लाटेत लहान मुलांना आढळून आली आहेत.

- पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत काेराेनाचा संसर्ग हाेण्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.

- काही मुलांना अतिसार हाेत असल्याचे आढळून आले आहे. मात्र अतिसारग्रस्तांचे प्रमाण कमी हाेते.

- काही मुलांमध्ये अशक्तपणा आढळून आला आहे.

बाॅक्स

बालकांवर उपचारासाठी प्रशासन सज्ज

तिसरी लाट मुलांवर आघात करणारी असल्याने आराेग्य प्रशासन सज्ज झाले आहे. बालरुग्णांची संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र काेविड केअर सेंटर किंवा रुग्णालय उभारला जाऊ शकते, अशी माहिती आराेग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काेट

मुलांना काेराेनाची लागण प्रामुख्याने त्याच्या पालकांपासूनच हाेते. त्यामुळे पालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. मुलांवर उपचार करताना अनेक अडचणी येतात. तिसऱ्या लाटेत मुलांना धाेका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालकांनीच याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

डाॅ. राहुल ठवरे, बालराेगतज्ज्ञ

काेट

काेराेना हा संसर्गजन्य राेग आहे. मुलाला काेराेना झाल्यास त्याच्यासाेबत पालकालाही रुग्णालयात राहावे लागेल. त्यामुळे मुलासाेबतच पालकांनाही काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता निर्माण हाेईल. बालकांवर उपचार करताना अनेक अडचणी येतात. त्यांंना रुग्णालयात १० दिवस ठेवणे कठीण हाेते. यासर्व अडचणी आहेत.

डाॅ. जयंत पर्वते, बालराेग तज्ज्ञ

एकूण काेराेनाबाधित-२७१०२

एकूण काेराेनामुक्त-२३६२४

१८ वर्षे वयाखालील रुग्ण-१०६०

१० वर्षे वयाखालील रुग्ण-६३५

दुसऱ्या लाटेतील रुग्ण-१७६२४