शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद आणि मनभेद दूर करणारा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:41 IST

तीळ संक्रांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. कोणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनोमिलन घडविणारा हा सण मनुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.

ठळक मुद्देतिळाच्या गोडव्यातून गैरसमज हद्दपार करायोगिता पिपरे नगराध्यक्ष, गडचिरोली

तीळ संक्रांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्वाचा सण आहे. कोणाबद्दल मनात असलेला राग, शंका, गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाने मनोमिलन घडविणारा हा सण मनुष्याला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.पूर्वी संक्रांतीला तीळगुळ घरोघरी नेऊन वाटले जायचे. आज वॉर्डावॉर्डात महिलांचे मेळावे घेऊन त्यांना एकत्रित केले जाते. या निमित्ताने महिलांची चर्चा होते. त्यांची मनं जुळतात. विशेष म्हणजे अनेक वेळा कोणतेही ठोस कारण नसताना केवळ गैरसमजातून अबोला किंवा राग केला जातो. ही गोष्ट सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नासवणारी आहे. पण या सणाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या महिला मनातील मळभ दूर करून सकारात्मकतेची नवीन सुरूवातच करतात. त्यामुळेच हा सण महिलांवर्गात प्रिय असतो.तीळगुळाच्या गोडव्यातून गोड बोलण्याचा संदेश देणाऱ्या या सणाचे महत्व त्यामुळेच मोठे आहे. आपण ही संस्कृती जपली पाहिजे. यासोबतच नवीन वर्षातील या पहिल्या सणाच्या निमित्ताने आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, चांगली पुस्तके वाचणे असे काही संकल्पही महिलांनी करावे.युवा पिढी मोबाईलच्या नादात बिघडत आहे. केवळ मनोरंजनात्मक गोष्टीत अडकून न पडता मनाला शांती देणाºया चार गोष्टी केल्यास कधीही मन अस्वस्थ होत नाही. तीळ संक्रांतीच्या निमित्ताने याचाही संकल्प आपण करूया.