शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाघ व बिबट्यांच्या दहशतीने जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शेतशिवारात पाळीव जनावरे चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर वाघबिबट्यांकडून हल्ले हाेण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. मागील महिनाभराच्या कालावधीत आठ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्यात आले. इतर उद्याेगही स्थापन हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे जंगल हे गडचिराेली जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण करत असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे. अशातच आता जंगलात वाघबिबट्यांची संख्या वाढायला लागली आहे. शेतावर जात असलेल्या नागरिकांवरही वाघ व बिबट्यांचे हल्ले हाेत आहेत. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. शेतावर जाणारा रस्तासुद्धा जंगलातून जाते. मंगळवारी आरमाेरी तालुक्यातील देलाेडा खुर्द येथील भीमदेव नागापुरे या शेतकऱ्याला वाघाने ठार केले. बुधवारी ही घटना उघडकीस आली. गाेंडपिंपरी तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब आष्टी परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले हाेते. मनाेज तिरूपती देवावार या सात वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले तर धानाेरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावातील एका महिलेच्या घरी बिबट्या शिरला. वनविभागाने त्याला पकडून जेरबंद केले. वाघ व बिबट्यांचे हल्ले वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आठ दिवसांपासून वाघ मिळेना- नरभक्षक असलेल्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी नागझिरा येथील स्पेशल टीम बाेलाविण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून ही टीम वाघाचा शाेध घेत आहे. मात्र वाघ मिळाला नाही.

आष्टीतील बिबट्याने अखेर मुलाचा बळी घेतलाचमागील दाेन महिन्यांपासून आष्टी परिसरातील पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर आहे. काेंबड्या, शेळ्या, बकरे, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ले करून त्यांना ठार केले. या बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत हाेती. मात्र, वन विभागाने लक्ष दिले नाही. अखेर साेमवारी पेपर काॅलनीतील एका मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात बालक बचावला. बुधवारी पुन्हा आष्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या मार्कंडा कं. येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मुलावर हल्ला केला. त्यात बालक ठार झाला. आता तरी या बिबट्याला जेरबंद करणार काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :leopardबिबट्याTigerवाघ