शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी योजनेत जिल्हा अव्वल स्थानावर

By admin | Updated: November 29, 2014 23:20 IST

गरीब नागरिकांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात मोफत उपचार मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत दोन वर्षात सुमारे

गडचिरोली : गरीब नागरिकांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात मोफत उपचार मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत दोन वर्षात सुमारे १ हजार ७६० रूग्णांवर उपचार करण्यात आले असून गडचिरोली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात २ जुलै २०१२ रोजी सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ही योजना अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, रायगड, वर्धा व मुंबई या ९ जिल्ह्यांमध्ये सुरू केली. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली. सद्य:स्थितीत ही योजना ३६ जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. या योजनेंतर्गत ९०० पेक्षा अधिक रोगांवर मोफत उपचार करण्यात येते. या योजनेचा लाभ पीवळा रेशन कार्ड, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना दिल्या जातो. या योजनेंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १ हजार ७६० रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यावर ९४ लाख ६१ हजार २०० रूपये खर्च झाले आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ तळागाळातील प्रत्येक रूग्णाला मिळावा यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य मित्र नेमण्यात आले आहेत. हे आरोग्य मित्र रूग्णांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच योजनेबाबत जनजागृती करीत आहेत. त्यामुळेच गडचिरोली जिल्हा नक्षलप्रभावित व मागास असला तरीही सर्वाधिक लाभ रूग्णांना मिळाला आहे. जीवनदायी योजनेंतर्गत केवळ जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव सलग्नीत असलेले रूग्णालय आहेत. त्यामुळे शेकडो किमी अंतर पार करून नागरिकांना या रूग्णालयात उपचारासाठी यावे लागते. जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालयेसुध्दा जीवनदायी योजनेसोबत जोडल्यास रूग्णांना अधिक सोयीचे होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)