शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात जिल्हा कारागृह सुरू होणार

By admin | Updated: January 13, 2015 22:58 IST

गडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा कारागृह इमारतीच्या दुरूस्ती व रंगरंगोटीच्या कामाला सुरूवात झाली असून विद्युत फिटिंगचे काम सुरू झाले आहे. राज्य शासनाने या कारागृहासाठी अधीक्षकासह

दुरूस्ती व रंगरंगोटीच्या कामाला वेग : अधीक्षकासह १२७ कर्मचारी नियुक्तीस शासनाची मंजुरीदिलीप दहेलकर - गडचिरोलीगडचिरोली येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा कारागृह इमारतीच्या दुरूस्ती व रंगरंगोटीच्या कामाला सुरूवात झाली असून विद्युत फिटिंगचे काम सुरू झाले आहे. राज्य शासनाने या कारागृहासाठी अधीक्षकासह १२७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून महिनाभरात जिल्हा कारागृह सुरू होणार असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने कारागृह विभाग प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत.नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील साध्या कैद्यांना जिल्ह्याच्या कारागृहात ठेवण्याची सुविधा व्हावी, या हेतूने राज्य शासनाने जिल्हा कारागृहाला मंजुरी प्रदान केली. कारागृह इमारतीचे बांधकाम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र हस्तांतरणाअभावी जिल्हा कारागृह सुरू होऊ शकले नाही. शासनाने या जिल्हा कारागृहासाठी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अधीक्षक, उपअधीक्षक, जेलर आदींसह १२७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे. सध्य:स्थितीत जिल्हा कारागृहात दोन जेलर व एक लिपिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारागृहाची इमारत पूर्णत्वास आल्यानंतर संरक्षणाअभावी या इमारतीतील विद्युत फिटींग तसेच साहित्याची दुरवस्था झाली होती. अनेक साहित्य चोरीला गेले होते. सदर बाब प्रसार माध्यमांनी उजेडात आणल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी भेट देऊन कारागृहाची पाहणी केली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात जिल्हा कारागृह सुरू होऊ शकले नाही. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल कैद्यांना नागपूर कारागृहात ठेवावे लागत होते. न्यायालयात सुनावणीच्या दरम्यान या कैद्यांना सुरक्षेच्या कारणावरून गडचिरोली न्यायालयात हजर करणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायप्रक्रियेत कैद्यांचा सहभाग राहत होता. याबाबीला मानवी हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. यासंदर्भात निकाल देताना न्यायालयाने गडचिरोली येथील कारागृह सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत आवश्यक प्रक्रियेला प्रारंभ केला.इंदाळा परिसरात असलेल्या जिल्हा कारागृहाच्या इमारतीचे प्रवेशद्वार व अन्य भिंतींना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानामध्ये विद्युत फिटींगचे काम सुरू असून महिला मजुरांकरवी संपूर्ण इमारतीची अंतर्गत स्वच्छता केली जात आहे. प्रवेशद्वारासमोर असलेल्या तिरंगा ध्वजाच्या स्तंभाची स्वच्छता सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर जिल्हा कारागृह १६ डिसेंबर २०१४ रोजी कारागृह विभागाला हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर कारागृह विभागाने आवश्यक त्या सोयीसुविधा करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. या जिल्हा कारागृहात पुरूष कैद्यांसाठी १० बॅरेकची व्यवस्था करण्यात आली असून येथे ४५० कैद्यांची क्षमता आहे. महिला कैद्यांसाठी स्वतंत्र बॅरेक तयार करण्यात आले असून या ठिकाणी जवळपास ५० महिला कैद्यांना ठेवण्याची सोय राहणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पाच इमारती उभारण्यात आल्या असून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. सध्य:स्थितीत बोअर मारून तात्पुरती पाणीपुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे. कारागृहातील अंतर्गत रस्त्याची व परिसराची स्वच्छताही करण्यात आली आहे.