शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार दाखले वाटप

By admin | Updated: August 6, 2014 23:50 IST

सिरोंचा तालुक्यात मंडळ व ग्रामस्तरावर चालू वर्षात ३ हजार ५८० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

योजना : सिरोंचा तालुक्यात महसूल विभागाची कामगिरीसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात मंडळ व ग्रामस्तरावर चालू वर्षात ३ हजार ५८० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांच्या लाभासाठी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सन २०१३-१४ या महसूल वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सिरोंचा तालुक्यात मंडळ व ग्रामस्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करून जातीचे ८४५, उत्पन्नाचे १ हजार ५, अधिवास, राष्ट्रीयत्वाचे ४९८, नॉनक्रिमिलीअर ३२६, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ८७, शिधापत्रिका ७६९ व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ५० जणांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत दाखल्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसीलदार डी. एस. भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून सिरोंचा पंचायत समितीचे उपसभापती अब्दुल रहिम गफ्फार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी १० जातीचे दाखले, नॉनक्रिमिलीअर २, अधिवास प्रमाणपत्र ८, उत्पन्नाचे दाखले १०, शिधापत्रिका २२, सातबारा २५, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ५ आदी दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, तलाठी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, कोतवाल यांना मागील वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्ती प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. महसूल विभागामार्फत सिरोंचा तालुक्यात मंडळ कार्यालय, तलाठी कार्यालयाच्यावतीने मागील वर्षी समाधान शिबिराच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. महसूल विभागाच्या योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काम केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी वंचित राहू नये म्हणून विशेष कार्य केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)