शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा

By admin | Updated: May 2, 2017 01:12 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ...

संघटनेतर्फे सत्कार : जि. प. अध्यक्षांना निवेदनगडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर व उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासोबत चर्चा केली व या समस्या सोडविण्याची मागणी केली. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया दरवर्षी राबवावी, दरवर्षी पाठविलेले गोपनीय अहवाल गहाळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सदर अहवाल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने अहवाल जतन करून ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावे, जास्त लोकसंख्या असलेल्या उपकेंद्रात अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावे, प्रत्येक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, एनआरएचएम कार्यक्रमामुळे वाढलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मिळण्याबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करावा, निलंबित कर्मचाऱ्यांना पूर्ववत सेवेत रूजू करून घ्यावे, एनआरएचएम अंतर्गत कर्मचाऱ्यांची ग्रेडेशन पद्धत बंद करावी, एनआरएचएम कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, सिकलसेल कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, फेब्रुवारी २०१६ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना नियमित ११ महिन्यांचे आदेश देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांना देण्यात आले. या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठस्तरावर आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिले. याप्रसंगी आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दीपक चौधरी, कमलेश झाडे, एम. एम. बोडुवार, आशा कोकोडे, लता तिहीतकर, शर्मिला जनबंधू, अमिता नागदेवते, भावना लाजूरकर, हिराजी मेश्राम, बाळू मेश्राम, नेताजी मेश्राम, राजेश जाधव, सिकलसेल संघटनेचे सुरेश ठाकरे, उमाकांत हर्षे, माधुरी भोयर, प्रशांत खोब्रागडे, गुड्डू कुनघाडकर, बावनथडे, फापनवाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)