शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने वैरागडवासीय त्रस्त

By admin | Updated: April 22, 2017 01:22 IST

मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या

विद्युत जनित्राचा अभाव : महावितरणच्या चुकीच्या नियोजनाचा फटका वैरागड : मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात विद्युत पुरवठा करण्यासाठी जे विद्युत जनित्र आहेत. त्यांची संख्या कमी आहे. तसेच महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळी धान पिकांसाठी आता रात्रंदिवस मोटार विद्युतपंप सुरू राहत असून कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वैरागड येथील गावाच्या सुरूवातीला रांगी-धानोराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, प्रशासकीय इमारतीच्या बाजुला एक आणि त्याच्याच बाजुला म्हणजे, पोल्ट्री फार्मजवळ व थोड्याच अंतरावर असे एकूण तीन विद्युत जनित्र उभारण्यात आले आहे. वास्तविक या ठिकाणी तीन विद्युत जनित्राची आवश्यकता नाही. चुकीचे नियोजन व नवीन विद्युत जनित्रास मान्यता नसल्याने विजेची समया निर्माण झाली आहे. येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या समस्येची रात्रंदिवस दखल घेत असले तरी वैरागड परिसरात आवश्यक असणाऱ्या क्षमतेपेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने काही दिवस तरी कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे तत्काळ यावर तोडगा काढावा, अशी मागणी वैरागडवासीयांनी केली आहे. अघोषित भारनियमनाविरोधात देसाईगंजच्या वीज कार्यालयावर नागरिक धडकले देसाईगंज : गेल्या काही दिवसांपासून देसाईगंज शहरात दररोज दोन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात तीन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. ऐन उकाड्याच्या दिवसात अघोषीत भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी देसाईगंजच्या वीज कार्यालयावर गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोर्चा काढला. राज्य शासनाने कुठलेही वीज भारनियमन जाहीर केले नसतानाही मागील एक महिन्यांपासून दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठ्याअभावी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. याशिवाय कमी दाबाची वीज समस्या शहरातील काही वार्डात आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात देसाईगंजच्या १०० नागरिकांनी कार्यालयावर धडक देऊन महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.