शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

नंदीगाव येथील उपकेंद्रासाठी इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST

झिंगानूरवासीयांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड झिंगानूर : झिंगानूरच्या ३० किमी परिघातात पातागुडम, रायगुडम, पेंडालाया, आसरअल्ली, देचलीपेठा, रामपल्ली, अमडेली, चिटुर, अंकिसा ...

झिंगानूरवासीयांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड

झिंगानूर : झिंगानूरच्या ३० किमी परिघातात पातागुडम, रायगुडम, पेंडालाया, आसरअल्ली, देचलीपेठा, रामपल्ली, अमडेली, चिटुर, अंकिसा आदी गावे येतात. झिंगानूरपासून पातागुडम ३० किमी, आसरअल्ली २६ किमी, देचलीपेठा व रोमपल्ली २५ किमी, तसेच अमडेली, चिटूर, अंकिसा ३० किमी अंतरावर येतात. याशिवाय परिसरात बरीच गावे आहेत. सिरोंचा तालुका मुख्यालयी येण्यासाठी नागरिकांना ५० ते ६० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसतो. झिंगानूर तालुका घोषित करून न्याय देण्याची मागणी आहे.

नदी पात्रातील शेतीवर कारवाई करा

गडचिरोली : नदीपात्रात भाजीपाला पिकांची लागवड करतात. भाजीपाल्यावर विविध पिकांची फवारणी केली जाते. त्यामुळे प्रदूषण होत असल्याने लागवडीवर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कढोलीत फुलली मक्याची शेती

कुरखेडा : तालुक्यातील कढोली परिसरातील शेतकरी आता रब्बी हंगामातील पिके घेण्यास प्राधान्य देत आहे. मका, हरभरा, भुईमूग, भाजीपाला अशी विविध पिके घेत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. रब्बी पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास फार मोेठी मदत झाली आहे.

महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी

आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला नाही. महाशिवरात्रीनिमित्त महादेवगडावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा मिळणे आवश्यक आहे. शासनाने लक्ष घालून महादेवगडाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अनेक पांदण रस्ते खडीकरणाच्या प्रतीक्षेत

गडचिरोली : तालुक्यातील अनेक गावांतील शेतशिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पावसाळ्यात चिखल पसरत असतो. मरेगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आठ वर्षांपूर्वी मातीकाम करण्यात आले, परंतु अद्यापही या मार्गाचे खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढावी लागते. मरेगाव-चांभार्डा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्याचे अंतर जवळपास तीन किमी आहे. या मार्गावर मध्यंतरी एक ते दीड किमीचा फाटा आहे. दोन्ही मार्गांवर एकाच वर्षी मातीकाम करण्यात आले. त्यानंतर, दोन वर्षांनी या मार्गावर मुरुम टाकण्यात आले, परंतु आठ वर्षांचा कालावधी उलटूनही खडीकरण झाले नाही. पावसाळ्यात या मार्गावरून चिखल पसरत असतो.

मुरमाडी परिसरात कव्हरेजची समस्या

गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी परिसरात काही दिवसांपासून बीएसएनएल सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. अमिर्झा येथे बीएसएनएल सेवेचे टॉवर असूनही निरुपयोगी ठरत आहे. सेवा विस्कळीत होत असल्याने, परिसरातील नागरिकांना विविध ऑनलाइन कामे करताना अडचणी येत आहेत.