शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाबंदीमुळे शेतकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. खरीपपूर्व हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली असल्याने शेतावर जाणे आवश्यक झाले आहे. मात्र ...

काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. खरीपपूर्व हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली असल्याने शेतावर जाणे आवश्यक झाले आहे. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ दिले जात नसल्याने शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

बाॅक्स ......

कापूस बियाणे खरेदी रखडली

चामाेर्शी तालुक्यात सर्वाधिक कापूस पिकाची लागवड हाेते. या तालुक्यातील शेतकरी कापसाची बियाणे गाेंडपिंपरी तालुक्यातून किंवा तेलंगणा राज्यातून खरेदी करून आणतात. गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत त्या ठिकाणी बियाणे स्वस्त मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने त्याच ठिकाणी बियाणे खरेदीसाठी शेतकरी जातात. मात्र यावर्षी जिल्हाबंदी असल्याने बियाणे खरेदी रखडली आहे. अनेक शेतकरी जिल्हाबंदी उठविण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

बाॅक्स .....

मागील वर्षी सातबारावर मिळत हाेता ई-पास

- मागील वर्षी याच कालावधीत जिल्हाबंदी लागू हाेती. मात्र शेतीचा हंगाम जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारावर ई-पास दिली जात हाेती. ई-पास काढण्याची प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळे सातबारा धरून चाैकीजवळ जात हाेते. शेतकऱ्यांच्या हंगामाचा विचार करून पाेलीस विभागही त्यांना जाण्याची परवानगी देत हाेता. यावर्षीही अशाच प्रकारची परवानगी मिळण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहे.

- काही कर्मचारी मात्र या सातबाराचा दुरूपयाेग करून ये-जा करीत हाेते. असा दुरूपयाेग हाेणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

काेट ......

पावसाळा आता जवळ आला आहे. सर्वच शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे करीत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांची शेती दुसऱ्या जिल्ह्यात आहे. त्यांची कामे ठप्प पडली आहेत. एसपी कार्यालयातून केवळ वैद्यकीय कारणासाठीच दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जात आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना ये-जा करण्याची मुभा द्यावी.- मधुकर नीलमवार, शेतकरी.

काेट .....

आमच्या परिसरातील बहुतांश शेतकरी तेलंगणा राज्यातूनच कापूस बियाणे व किटकनाशके खरेदी करून आणतात. त्याठिकाणी गडचिराेली जिल्ह्याच्या तुलनेत स्वस्त दरात बियाणे व किटकनाशके उपलब्ध हाेतात. यावर्षी जिल्हाबंदी असल्याने अजुनपर्यंत बियाणे व किटकनाशके खरेदी केली नाहीत. जिल्हाबंदीतून सुट मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. - बाबुराव बट्टे, शेतकरी.