शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

सततच्या पावसामुळे धान पेरणीच्या कामात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:25 IST

शेतकरी साधारणपणे मे महिन्यात शेतातील आंतरमशागतीची कामे आटोपून जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस आल्यावर धान पेरणी करू, असा बेत ...

शेतकरी साधारणपणे मे महिन्यात शेतातील आंतरमशागतीची कामे आटोपून जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस आल्यावर धान पेरणी करू, असा बेत आखत होते. मात्र, गतवर्षी मृगाचा अपेक्षित पाऊस आला नाही. त्यामुळे पेरणीचे काम आद्रा नक्षत्रात करावे लागले होते. या वर्षी मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, तेव्हापासून अधूनमधून पाऊस येत आहे, त्यामुळे भातखाचरात अधिक ओलावा आहे. अशा अवस्थेत धान पेरणी करणे शेतकऱ्यांना अवघड जात असते. सध्या भातखाचरात नांगरणी केली असल्याने सखल भागात पाणी साचून शेत जमिनीत दलदल झाली आहे. त्यामुळे पेरणी काम अशा परिस्थितीत केले जात नाही, म्हणून शेतकरी मृगाचा शेवटच्या चरणात तरी पेरणी करू, या आशेवर दिवस मोजत आहेत. मृगाच्या पावसात केलेल्या पेरण्या शेतीला सुबक अशा असतात. मात्र, पावसाने उसंत घेऊन कडक उन्ह लागल्यास पेरणीचे काम करण्यासाठी सोयीचे होत असते. यासाठी शेतकरी बी-बियाणे यांची सोय करून ठेवली आहे, तर काही शेतकरी बी-बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे घरगुती बियाणे वापरण्यासाठी बियाणे पेरणीलायक करीत आहेत. तालुक्यातील काही भाग वगळता खरिपातील पीक हे वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी जमिनीत अपेक्षित ओलावा प्राप्त झाल्यानंतर पेरणीचे काम करीत असतात. रोवणी खर्च कमी करण्यासाठी शेतकरी आवत्या टाकत असतात व रोवणी करण्यासाठी धान पऱ्हे टाकून रोपांची अपेक्षित वाढ झाल्यावर त्याची लागवड करीत असतात. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. धूळ पेरणी केलेले पऱ्हे जमिनीतून बाहेर डोकावत आहेत. वरच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी हलक्या धानाची लागवड करीत असतात, तर काही शेतकरी मध्यम व जड धानपिकांची लागवड करीत असतात. यासाठी मुखत्वे जयश्रीराम, जयप्रकाश, सोनम, सोनालिका, हिरा, वायएसआर, यासोबतच संकरित वाणाची लागवड करीत असतात.

बी-बियाणे यांच्या किमती दरवर्षी वाढत जात असतात. त्यामुळे पीक लागवड खर्च वाढत चालला आहे. मात्र, हमीभाव त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला. सध्या शेती करणे परवडणारे नाही, तरीही एक व्यवसाय म्हणून शेतकरी शेती करतात. यासाठी शेतकरी दरवर्षी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून बॅंकाकडून कर्ज घेत असतात. काही शेतकरी कारभारणीचे दागिने गहान ठेवून पीक लागवड करीत असतात. या वर्षी शेतकऱ्यांना बोनस मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलेले आहे, तसेच वाढत्या महागाईच्या काळात शेती करणे शेतकऱ्यांना अडचणीचे जात आहे.