लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस पडत असल्याने हलक्या धानाला याचा फटका बसला आहे. हातात आलेले धानपीक पावसाने भिजत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा नाही, अशा शेतकºयांनी हलक्या धानाची लागवड केली आहे. धानाची कापणी सुरू असतानाच पावसाने जोर धरला आहे. काही शेतकºयांनी धानाची कापणी लांबणीवर टाकली आहे. तर ज्या शेतकºयांनी धानपीक कापले आहे, अशा शेतकºयांच्या धानाच्या कडपा पावसाच्या पाण्यात भिजत आहेत. दमट वातावरणामुळे यावर्षी धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. कीटकनाशके फवारून रोगाच्या कचाट्यातून धानपीक वाचविले. यावर प्रचंड खर्च सुद्धा झाला आहे. आता ऐन धान कापणीत पाऊस पडत आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास धानपिकाचे प्रचंड नुकसान होणार आहे. पंचनामे करून मदत देण्याची मागणी आहे.
धानाचा कडपा पावसाने भिजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:11 IST
मागील आठ दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस पडत असल्याने हलक्या धानाला याचा फटका बसला आहे. हातात आलेले धानपीक पावसाने भिजत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
धानाचा कडपा पावसाने भिजला
ठळक मुद्देवैरागड परिसरातील स्थिती : पंचनामे करून मदतीची मागणी