शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पुलाअभावी रखडला १० गावांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:53 IST

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता येत नाही.

ठळक मुद्देबांडिया नदी : पावसाळ्यात तीन महिने आवागमन बंद; नागरिकांना होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो.बांडिया नदी परिसरात दोन्ही बाजूला दहा पेक्षा अधिक गावे आहेत. या गावातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करावी लागते. दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत नदीतून ये-जा करणे शक्य होते. परंतु पावसाळ्यात नदीतून पाणी वाहत असल्याने आवागमन करता येत नाही. तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपली, बुरगी, जिजावंडी, इरपनारसह अन्य दोन गावातील नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. या गावातील नागरिकांना बांडिया नदी ओलांडून विविध कामांकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. मागील अनेक वर्षांपासून बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.एटापल्ली तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक नागरिक छत्तीसगड येथे विविध वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यास छत्तीसगड राज्यात पुन्हा व्यवसाय वाढू शकते. तसेच दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीची दखल घेण्याची गरज आहे.गरजेच्या वस्तूंची व्यवस्थापावसाळ्यात नागरिकांना तीन महिने पुरेल ऐवढ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पावसाळ्यापूर्वीच खरेदी करून न्याव्या लागतात. विशेष म्हणजे, पावसाळ्यात पुरांमुळे या परिसरातील विद्यार्थी एटापल्ली येथे शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाही. त्याबरोबरच रूग्णांची प्रकृती बिघडल्यास त्यांना एटापल्ली येथे उपचारासाठी आणता येत नाही. गरजेच्या वस्तूंची व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी