शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

वन व कृषी संस्कृतीचा विकास व्हावा

By admin | Updated: February 26, 2017 01:46 IST

ज्या ठिकाणी कापसाची शेती आहे, अशाच भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत.

अभय बंग : तिसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली : ज्या ठिकाणी कापसाची शेती आहे, अशाच भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत. त्या तुलनेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी आहेत. कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या एकरूप व्हाव्या यासाठी शेतकरी नेते शरद जोशींनी प्रयत्न केले. औद्योगिक संस्कृती व तंत्रज्ञान संस्कृतीचा विकास झाला. मात्र वनसंस्कृती व कृषी संस्कृतीचा फारसा विकास झाला नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी वन व कृषी संस्कृतीचा व्हावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक डॉ. अभय बंग यांनी केले. अखिल भारतीय तिसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा येथील संस्कृती सभागृहातील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरीत शनिवारी थाटात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप, शेतकरी नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, काकासाहेब गडकरी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, देवराव पाटील म्हशाखेत्री, शालिक पाटील नाकाडे, ईश्वर मत्ते, अरविंद बोरकर, अशोक गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेली ३० वर्ष सातत्याने आंदोलन झाले. मात्र आंदोलनाचा मार्ग जेव्हा अवरूध्द होतो तेव्हा त्या-त्या आंदोलनाची पुनरावृत्ती होते. आंदोलनाला यश मिळण्यासाठी मार्ग बदलविणे गरजेचे आहे. पुनरावृत्ती टाळली पाहिजे. शेतकरी आंदोलनाला आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे डॉ. बंग म्हणाले. डॉ. शेषराव मोहिते म्हणाले, १९९० सालानंतर आपण आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासून सभोवतालच्या बदलाचा वेगही वाढला. मात्र या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणार नाही, अशीच आर्थिक धोरण राहिली. खुलीकरण आले ते उद्योगधंद्याच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. शेती क्षेत्रात खुलीकरण आलेच नाही. विकासाच्या प्रक्रियेतील अपरिहार्य ेटप्पा म्हणून खुलीकरण स्वीकारण्यात आले. मात्र राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे अन् विचारसरणीचे असोत त्यांनी या खुल्या अर्थव्यवस्थेचा शिरकाव शेती व्यवसायात होऊच दिला नाही. यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे, असे डॉ. मोहिते म्हणाले. संमेलनाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संचालन प्रा. मनिषा रिठे यांनी केले. सदर कार्यक्रमात आम्ही लटिके ना बोलू, कंसातील माणसं, माझी गझल निराळी या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी) गझलेतून शेतकरी जीवनाचे वास्तव मांडले सदर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात शेतकरी गझल मुशायराचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ईश्वर मत्ते, विनय मिरासे, श्रीनिवास गेडाम यांच्यासह अनेक कवींनी गझल सादर करून शेतकऱ्यांच्या वेदना, दु:ख व जीवनातील खरे वास्तव मांडले.