शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

योजनेच्या लाभातून विकास साधा

By admin | Updated: January 18, 2017 01:43 IST

तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत.

दिवाणी न्यायाधीशांचे आवाहन : धानोरात हक्क, संरक्षणावर कायदेविषयक शिबिर धानोरा : तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन आदिवासींनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन धानोराचे दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा समितीचे अध्यक्ष ली. दा. कोरडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक आराखडा २०१७ च्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती व धानोरा न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी ‘आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणी योजना २०१५’ या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी न्या. कोरडे बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे, गटविकास अधिकारी नीलेश वानखेडे, अधिवक्ता टी. के. गुंडावार, सहायक सरकारी अभियोक्ता खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आरोग्य योजनांबाबतची माहिती विस्ताराने दिली. भारतीय राज्यघटनेच्या अधिकारानुसार विकासापासून वंचित असलेल्या प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांनी योजनेची अद्यावत माहिती ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी सावसाकडे यांनी केले तर आभार पंचायत विस्तार अधिकारी एल. बी. जुवारे यांनी मानले. याप्रसंगी बहुसंख्य ग्रामसेवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी धानोरा पं. स. चे कक्ष अधिकारी शिवणकर यांच्यासह कर्मचारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)