शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजची रूग्णवाहिका २२ दिवसांपासून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 01:02 IST

स्थानिक ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका मागील २२ दिवसांपासून बेपत्ता आहे.

सावंगीचा रूग्ण दगावला : प्राथमिक आरोग्य केंद्रावर कारभार अवलंबून देसाईगंज : स्थानिक ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका मागील २२ दिवसांपासून बेपत्ता आहे. रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण रूग्णालयाला परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेच्या आधारावर काम करावे लागत आहे. रूग्णवाहिकेविना एका अपघातग्रस्त रूग्णाचा जीव गेला. मात्र आरोग्य यंत्रणेला याचे काहीही सोयरसुतक नाही. गतवर्षी मिळालेल्या या रूग्णवाहिकेत बिघाड आल्यामुळे मागील २२ दिवसांपासून ग्रामीण रूग्णालय रूग्णवाहिकाविना आहे. रूग्णवाहिका नसल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथे २४ एप्रिलच्या रात्री अज्ञात वाहनाच्या धकेत साजन बापुराव गुरनुले (२०) व मंगेश लोणबले (२४) हे दोघे जखमी झाले. नागरिकांनी आॅटोमधून दोघांनाही ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र साजन गंभीर असल्याने त्याला गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविने आवश्यक होते. ग्रामीण रूग्णालय प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका बोलावली. मात्र येण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे साजनचा जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला. रूग्णवाहिका वेळीच उपलब्ध झाली असती तर साजनचा प्राण वाचला असता, अशी माहिती सावंगी येथील नागरिकांनी दिली आहे. या संदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिकारी गौरव सहारे यांना विचारणा केली असता, रूग्णवाहिकेसाठी अनेक पत्रव्यवहार झाले. मात्र भंगार रूग्णवाहिका रूग्णालयाला देण्यात येत आहे. त्यातूनच आम्ही जिल्हा सामान्य रूग्णालयाला अत्यावस्थ रूग्ण पाठवितो, अशी माहिती दिली. (वार्ताहर)