शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज-आरमोरी मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: August 19, 2016 00:55 IST

देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे.

अस्तरीकरण उखडले : वाहनधारक त्रस्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष देसाईगंज/आरमोरी : देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. देसाईगंजवरून गडचिरोलीला जाण्यासाठी हा प्रमुख राज्य महामार्ग असून यामार्गावरून नेहमीच अवजड वाहने व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. देसाईगंज ते कोंढाळापर्यंत ते कोंढाळा ते कासवी फाट्यापुढील १ किमीपर्यंत या डांबरी मार्गावरचे अस्तरीकरण पूर्णत: उखडून गेल्याने मार्गाला मोठमोठ्या खाचा पडल्या आहेत. मूळ रस्त्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत लावलेले डांबराचे लेप पूर्णपणे निघून गेल्याने उंच बट्या पडल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून या मार्गावरील हे अस्तरीकरण उखडत चालले आहे. काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. देसाईगंजवासीयांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. खड्ड्यांमुळे व अस्तरीकरण निघाल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या मार्गावरून छत्तीसगडकडे जाणारे ट्रक चालत असल्याने रस्त्याची दुर्दशा आणखी वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे अवस्था बकाल झाली आहे. सदर मार्ग दुरूस्तीबाबत देसाईगंज व आरमोरी येथील अनेक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे. आरमोरीजवळ खड्ड्यांची संख्या प्रचंडप्रमाणात असल्याने एक खड्डा चुकविला तरी दुसऱ्या खड्ड्यामध्ये वाहन जाऊन पडत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे दरदिवशी शेकडो नागरिक देसाईगंज येथे येतात. येथील रेल्वेस्थानकावर उतरविलेला माल जिल्हाभरात वितरित केला जातो. त्यामुळेही वाहनांची वर्दळ वाढली आहे. खड्ड्यांमुळे अपघातही वाढले आहेत. (तालुका/शहर प्रतिनिधी)