शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणामुळे नक्षली नेत्याची पदावनती

By admin | Updated: October 14, 2015 01:57 IST

एका नक्षली महिला नेत्याशी असलेल्या प्रेमप्रकरणाची वाच्यता झाल्याने ज्येष्ठ माओवादी नेता ...

वाच्यता केली : गजराला अशोकला प्रकरण भोवलेगडचिरोली : एका नक्षली महिला नेत्याशी असलेल्या प्रेमप्रकरणाची वाच्यता झाल्याने ज्येष्ठ माओवादी नेता व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गजराला अशोक यास नक्षल्यांच्या कोअर कमिटीने पदावनत केल्याचे वृत्त आहे.यासंदर्भात छत्तीसगडच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत गडचिरोली पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार नक्षल्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गजराला अशोक याची पदावनती करून त्याला केवळ विभागीय समितीचा सदस्य बनविण्यात आले आहे. माओवाद्यांची दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी ही दक्षिण छत्तीसगड, तसेच शेजारील तेलंगणा, ओडिसा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाला नियंत्रित करीत असते. पोलिसांच्या हाती लागलेल्या दस्तऐवजानुसार, ४२ वर्षीय गजराला अशोक हा बंडखोर होता व नक्षल चळवळीत असलेल्या महिला नेत्यांशी त्याच्या असलेल्या प्रेमसंबंधावरून त्याची पदावनती करण्यात आली आहे. शिवाय विभागीय समिती सदस्य बेज्जारपू किसन व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य इंगोलापू या दोघांनादेखील प्रेमसंबंधाच्या कारणावरूनच पदावनत करण्यात आले होते, अशी माहिती छत्तीसगडचे पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) दीपांशू काबरा यांनी दिली. चळवळीत प्रेम, लग्न व मुलाचा विचार करावयाचा नाही, असे स्पष्ट निर्देश नक्षल चळवळीत दिले जातात. नक्षल चळवळीमधील अनेक आजारी सदस्यांवर उपचार होत नाहीत, अशी माहिती आत्मसमर्पित नक्षल्यांनी पोलिसांना दिली आहे. एखादा सदस्य असे कृत्य करीत असल्याचे दिसताच ज्येष्ठ नेते त्यास नसबंदी करावयास सांगतात. चळवळीत कठोर नियम असतानाही प्रेमप्रकरणे पुढे येऊ लागल्याने हा विषय नक्षल चळवळीसाठी चिंतेचा विषय झाला आहे, शिवाय चळवळीला त्याचा फटका बसत आहे, असे पोलिसांना प्राप्त झालेल्या नक्षल्यांच्या कागदपत्रांवरून दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे.