शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव व चोप गावांमध्ये डेंग्यूचा कहर

By admin | Updated: August 14, 2014 23:43 IST

तालुक्यातील कोरेगाव व चोप या भागात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या दोन गावात सुमारे डेंग्यूचे १२ रूग्ण आढळलेले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष

देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव व चोप या भागात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या दोन गावात सुमारे डेंग्यूचे १२ रूग्ण आढळलेले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. कोरेगाव व चोप या दोन गावांमध्ये यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासूनच डेंग्यूचे रूग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात डेंग्यूची साथ या गावांमध्ये पसरली होती. याबाबत ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते. तरीही आरोग्य यंत्रणेने फारशी उपाययोजना या गावांमध्ये केली नाही. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना डेंग्यूचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र ग्रामपंचायतींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. जून महिन्यात कोरेगाव येथील एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला होता. डेंग्यूची लागण झालेल्या भागात आरोग्य विभागाकडून स्वतंत्र शिबिर आयोजित करून गावातील संपूर्ण नागरिकांची तपासणी करण्यात येते व त्यांना औषधोपचार करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये डेंग्यू या आजाराविषयी जनजागृती करण्यात येते. मात्र एका रूग्णाचा मृत्यू होऊनही या भागात कोणतीही उपाययोजना अजूनपर्यंत करण्यात आली नाही. दोन्ही गावातील सुमारे १२ रूग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू हा महाभयंकर रोग असल्याने नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात धान पीक रोवणीचे काम सुरू आहे. धान रोवणीसाठी मजूर मिळत नसल्याने आबालवृद्ध धान पिकाच्या लागवडीत व्यस्त आहेत. अशा स्थितीत काही घरातील रूग्ण मात्र खाटेवर पडून आहेत. महत्वाचे म्हणजे मागील तीन महिन्यांपासून सतत डेंग्यूची साथ असतांनाही ग्रामपंचायत प्रशासनाचे गावातील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पडून आहेत. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हास्थळावरील अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या दोन्ही गावांमध्ये आरोग्य शिबिर घ्यावे, अशी मागणी आहे.