शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यात डेंग्यूची साथ

By admin | Updated: September 6, 2014 01:55 IST

चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध आजारांनी थैमान घातले असल्याने दररोज ४० ते ५० रूग्ण रूग्णालयात उपचारार्थ भरती होत आहेत.

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध आजारांनी थैमान घातले असल्याने दररोज ४० ते ५० रूग्ण रूग्णालयात उपचारार्थ भरती होत आहेत. तालुक्यातील ५ ते ६ गावांमध्ये डेंग्यू आजाराची साथ पसरल्याने रूग्ण गडचिरोली, चंद्रपूरच्या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी भरती होत आहेत. चामोर्शीतील ग्रामीण रूग्णालयात दररोज पाच ते सहा डेंग्यूचे रूग्ण दाखल होत आहेत. परिणामी रूग्णालयात रूग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. डेंग्यूच्या तापाचे अनेक रूग्ण रूग्णालयात भरती होत असल्याने अनेकांना प्लेटलेट व रक्ताची आवश्यकता भासत आहे. परंतु ग्रामीण रूग्णालयात या सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना गडचिरोली, चंद्रपूरला रेफर केले जात आहे. ग्रामीण रूग्णालयात प्रतिनिधीने भेट दिली असता, रूग्णालयात रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. ही गर्दी नित्याचीच बाब आहे. दररोज ४० ते ५० रूग्ण दाखल होतात, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंद्रजीत नागदेवते यांनी सांगितले. ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची एसबीसी टेस्ट होऊ शकते. परंतु प्लेटलेटची व्यवस्था नसल्याने अनेक रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात रेफर करावे लागत आहे. ब्लड बँक नसल्याने पुरेशाप्रमाणात रक्ताची व्यवस्था अनेक रूग्णांना वेळेवर होऊ शकत नाही. डेंग्यूच्या रूग्णांना शौचास त्रास, रक्त जाणे, काळेडाग पडणे, रक्तवाहिणी फुटणे, असा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कमी झालेले प्लेटलेट वाढविण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर येथे भरती करण्याशिवाय पर्याय राहत नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवरी यांनी सांगितले. येथील ग्रामीण रूग्णालयात दुर्गम गावातील नागरिक उपचार करण्यासाठी येतात. या रूग्णांना वेळेवर योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिवाकर यासलवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)