शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना पदावरून हटवा

By admin | Updated: February 11, 2016 00:12 IST

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अडचणीत आहेत.

आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची मागणी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अडचणीत आहेत. येथे राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड अवहेलना होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे, कार्यवाह देवानंद वालदे, संयोजक चांगदास मसराम, आशिष बांबोळे आदींनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थेमार्फत राजे धर्मराव मुलांचे वसतिगृह नागेपल्ली येथे चालविले जाते. या वसतिगृहात बाथरूम, किचन, स्वयंपाकासाठी साहित्य नाही, मागील चार महिन्यांपासून वसतिगृहात धान्य पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. फक्त दोन किलो तांदूळ, तेल, दाळ देऊन संस्थापक तथा पालकमंत्री विद्यार्थ्यांचे शोषण करीत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. मंत्र्याच्या वसतिगृहात अशी परिस्थिती असेल तर राज्यात स्थिती किती गंभीर असावी, याची प्रचिती येते. त्यामुळे त्यांना त्वरित पदावरून दूर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.