शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहासमोरचे अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 01:32 IST

मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या इमारतीसमोर एका महिलेने अतिक्रमण करून झोपडी बांधली आहे.

तहसीलदारांना निवेदन : अतिक्रमित झोपडीमुळे हस्तांतरण रखडले एटापल्ली : मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या इमारतीसमोर एका महिलेने अतिक्रमण करून झोपडी बांधली आहे. त्यामुळे संरक्षण भिंतीचे बांधकाम होऊ शकले नाही. परिणामी वसतिगृहाच्या सुसज्ज नवीन इमारतीचे हस्तांतरण होण्यास विलंब होत आहे. विद्यार्थिनींना जुन्याच इमारतीत राहावे लागत आहे. तहसीलदारांनी पुढाकार घेऊन वसतिगृहाच्या परिसरातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी विद्यार्थिनींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तहसील कार्यालयाच्या बाजूलाच वसतिगृहाची नवीन इमारत बांधली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या इमारतीच्या प्रांगणात गावातीलच एका महिलेने झोपडी बांधली आहे. परिणामी संरक्षण भिंतीचे बांधकाम अर्धवटच थांबले आहे. संरक्षण भिंत बांधून झाली नसल्याने इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे. जुन्या वसतिगृहाची इमारत अत्यंत लहान आहे. या ठिकाणी सोयीसुविधांचाही अभाव आहे. नवीन इमारतीचा ताबा घेऊन त्या ठिकाणी वसतिगृह सुरू करणे आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणामुळे इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे. तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून जागा खुली करून द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे. सदर निवेदन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आयुक्त बाजीराव जाधव यांनाही पाठविले आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थिनींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)