शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

डीएफओंच्या आदेशाची अवहेलना

By admin | Updated: July 30, 2016 01:51 IST

भामरागड वन विभागातील गट्टा वनपरिक्षेत्रातील तत्कालीन स्वच्छक पदावर कार्यरत के. के. सहारे यांची भामरागड ....

प्रथम अपील दाखल : माहिती देण्यास गट्टा वनपरिक्षेत्र कार्यालयाची टाळाटाळ आलापल्ली : भामरागड वन विभागातील गट्टा वनपरिक्षेत्रातील तत्कालीन स्वच्छक पदावर कार्यरत के. के. सहारे यांची भामरागड वन विभागात विविध देयके प्रलंबित होती. सदर देयके निकाली काढण्याकरिता त्यांनी उपवनसंरक्षक भामरागड यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर यासंदर्भात कार्यपूर्तीचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश उपवनसंरक्षकांनी गट्टा वनपरिक्षेत्र कार्यालयास दिले. मात्र यावर वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने उपवनसंरक्षकांच्या आदेशाची अवहेलना होत आहे. के. के. सहारे यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) भामरागड वन विभाग आलापल्ली यांच्याकडे अपील केली आहे. के. के. सहारे सध्या आलापल्ली वन विभागातील मार्र्कं डा (कं.) वनपरिक्षेत्रात वाहनचालक या पदावर कार्यरत असून यापूर्वी ते भामरागड वन विभागातील गट्टा वनपरिक्षेत्रात स्वच्छक पदावर कार्यरत होते. या कालावधीत त्यांची विविध प्रकारची सात देयके भामरागड वन विभागाकडे प्रलंबित होती. त्यामुळे सदर देयके निकाली काढण्याकरिता उपवनसंरक्षक भामरागड यांच्याकडे मागणी केली असता, यापैकी निलंबन कालावधीमधील उर्वरित वेतन १३ महिने ७ दिवसांचे तथा कर्तव्यात हजर असतानाही गट्टाचे तत्कालीन प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गैरहजर दाखवून कपात केलेले पाच महिन्यांचे वेतन गट्टा वनपरिक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पत्र क्रमांक १९७६ तथा १९७७, ७ नोव्हेंबर २०१५ अन्वये गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना यावर तत्काळ योग्य कार्यवाही करून याविषयी कार्यपूर्ती अहवाल उपवनसंरक्षक कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच वन गुन्ह्यातून निर्दोष ठरल्यानंतर सहारे यांचा १३ महिने ७ दिवसांचा निलंबन कालावधी हा सेवा कालावधी समजण्यात यावा, असे आदेश उपवनसंरक्षकांनी निर्गमित करून पुढील कार्यवाहीकरिता गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे अग्रेषित केले होते. परंतु सात महिने उलटूनही तिन्ही आदेशावर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली नाही. (वार्ताहर) दोन महिने उलटूनही माहिती दिली नाही सहारे यांचे वेतन देयक प्रलंबित असल्यामुळे सदरच्या प्रलंबनाविषयीची माहिती माहितीच्या अधिकारान्वये गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे मागितली. ३० दिवसांच्या कालावधीत सदर माहिती देणे बंधनकारक असतानाही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ती दिली नाही. सध्या अर्ज करून ६८ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र माहिती मिळाली नाही. माहितीच्या अधिकारानुसार दफ्तर दिरंगाई अधिनियमान्वये स्पष्टपणे उल्लंघन होत असून गट्टा वनपरिक्षेत्र अधिकारी शिक्षेस व दंडास पात्र आहेत. ते सदर माहिती देण्यास हेतूपुरस्सर टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करीत सहारे यांनी अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केली आहे.