शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पराभवावरही वादंगच

By admin | Updated: May 18, 2014 23:32 IST

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच

 गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार व बहुतांश नेते करीत आहे. मात्र काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा हा पराभव राज्य सरकारची नार्केता व लोकप्रतिनिधी, आमदार यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष सत्तेमुळे अंगात शिरलेला अहंकार, मतदार संघाकडे लक्ष न देता भारताच्या विविध राज्यांमध्ये वर्षातून किमान २ महिने तरी दौरा करणारे लोकप्रतिनिधी ही पराभवाची कारणे आहेत, असे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकूणच दारूण पराभवावरही काँग्रेस पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यात एक स्वर नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेस या पराभवापासून काही बोध घेईल, अशी स्थितीमात्र सध्यातरी दिसून येत नाही, अशी भावना अनेक जुन्या काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र येतात. यातील दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाला मानणारे सहयोगी अपक्ष आमदार होते. मागील चार वर्षात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी अनेक निर्णय केले. स्वतंत्र विद्यापीठ दिले, गडचिरोलीसाठी स्वतंत्र महिला रूग्णालय दिले, सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुलाचे काम सुरू केले, कोटगल, चिचडोह बॅरेजसारख्या सिंचन योजना सुरू केल्या, अनेक शासकीय इमारती उभ्या केल्या, तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामपंचायतीला दिले, बंगाली बांधवांना जमीनपट्टे दिले, असे असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार जनतेपर्यंत हे विकास कामे घेऊन जाण्यात अपयशी ठरले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचा २ लाख ३६ हजारावर अधिक मताचा पराभव झाला. यातील किमान १ लाख ८० हजार मताचा पराभव आमदारांची अ‍ॅन्टी इनकंबन्शीच्या खात्यावरच मोडणारा आहे. प्रत्येक काँग्रेस आमदाराच्या मतदार संघात किमान २५ ते ३० हजाराची माघार अशीही होणारच होती व मतदानानंतर काँग्रेस नेतेही ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाबाबत कबूल करीत होते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मतपेटी फुटल्यानंतर मोदीलाट दिसून आली. निवडणुकीत प्रचाराला फिरताना काँग्रेसच्या कुण्याही नेत्याला मोदीलाट दिसली नाही. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मोदीलाटेचा वापर आता काँग्रेसचे लोकप्रतिनिधी व नेते करीत आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकांपर्यंत लोकप्रतिनिधी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जात नाही. प्रश्न सुटो न सुटो आमदार आपल्याला भेटला याचे समाधान हे सामान्य मानसासाठी महत्वाचे आहे. हे या निकालाने काँग्रेसला सांगितले आहे. अशोक नेते यांचा मागील पाच वर्षाचा संपर्क त्यांच्या विषयासाठी महत्वाचा ठरला, ही बाब आज काँग्रेस कार्यकर्ते खासगी चर्चेतही मान्य करीत आहे. काँग्रेसचे आमदार गरीब माणसापर्यंत जातच नाही. गावपुढार्‍यांना भेटून परत येतात, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षाच्या काळात आमदारांच्या भोवती निर्माण झालेले वलय ही आर्थिक समृध्दीची साक्ष देणारा आहे. काँग्रेस पक्ष या प्रचारालाही तोंड देण्यात कमी पडला. काँग्रेस पक्षाचे खिळखिळ झालेले पक्ष संघटन पुन्हा बांधण्याची गरज आहे. बहुजन समाजाचा जिल्हाध्यक्ष असताना आजवर काँग्रेसची कधीही एवढीमोठी वाताहत झाली नाही, ही बाबही अनेक नेते व कार्यकर्ते आता बोलून दाखवित आहे. पक्ष संघटन पुन्हा योग्य लोकांच्या हातात सोपविण्याची गरज आहे. गटातटाचा विचार न करता पुन्हा तयारी करावी लागणार आहे, असे कार्यकर्ते म्हणतात.