शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या ४८८३ अर्जात गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:47 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ४ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या माहितीत विसंगती आढळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन भरलेली माहिती, ....

ठळक मुद्देतालुकास्तरावर फेरपडताळणी सुरू : आतापर्यंत २८ हजार ९८४ शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ४ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या माहितीत विसंगती आढळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन भरलेली माहिती, बँकांनी पाठविलेली माहिती आणि सेवा सहकारी सोसायट्यांकडील माहिती पडताळून माहितीची पुनर्पडताळणी केली जात आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील २८ हजार ९८४ शेतकऱ्यांना ७१ कोटी ४३ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करून त्यातून थकित कर्जाची रक्कम भरण्यात आली. आतापर्यंत ३३ हजार ७९८ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यापैकी ४३७ शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी होणे बाकी आहे. मात्र ४ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या माहितीत ताळमेळ जुळत नसल्याचे आढळले. त्या शेतकऱ्यांची यादी त्यांच्या बँकेत लावण्यात आली आहे. तालुकास्तरावर सहायक निबंधकांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून आता त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यात शासकीय लेखा परीक्षक, संबंधित बँकेचे शाखाधिकारी आणि वि.वि.कार्यकारी संस्थांचे प्रतिनिधी हे कागदपत्रांची तपासणी करीत आहेत.बँकेत निधी प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून योजनेचा लाभ देणे व प्रोत्साहन अनुदान शेतकºयांच्या बचत खात्यात जमा करणे हा अंतिम टप्पा बँकांचा राहणार आहे.प्रलंबित प्रकरणांसाठी तालुकास्तरीय समित्याआतापर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ ज्यांना मिळाला नाही अशा शेतकऱ्यांमधील पात्रता निश्चित करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती आता अंतिमरित्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करून पात्र शेतकºयांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांच्या याद्या बँकनिहाय प्रसिध्द करण्यात येत आहेत.ज्या कारणास्तव प्रकरण प्रलंबित आहे ती कागदपत्रे शेतकऱ्यांकडून प्राप्त करून घेणे व त्या आधारे पात्र/अपात्र ठरविण्याबाबत अंतिम निर्णय घेणे, तसेच पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे आदी कामे ही समिती करणार आहेपात्रता सिद्ध करु न लाभ घ्यावा !ज्या शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर केले, मात्र त्यांची प्रकरणे प्रलंबित आहे अशा सर्व शेतकºयांनी आपल्या कागदपत्रांसह ज्या ठिकाणाहून कर्ज घेतले आहे अशा बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना भेटावे. आपल्या अर्जाच्या पात्रतेचे पुरावे सादर करावेत व या कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे यांनी केले आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.