लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी उपविभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यातीलही तहसीलदारांकडून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी छत्रपत्री शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा आढावा घेतला.यावेळी अहेरीचे प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी, तहसीलदार प्रशांत घारूडे, सिरोंचाचे तहसीलदार कडार्लावार, भामरागडचे तहसीलदार कोकडे, एटापल्लीचे तहसीलदार थेटे, मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे, नगरसेवक गिरीश मद्देर्लावार, संतोष पडालवार उपस्थित होते.शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुदत संपण्यापूर्वी शेतकºयांकडून अर्ज भरून घ्यावे, केंद्रचालक अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करीत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, शेतकºयांना अर्ज भरताना कोणतीही अडचण येत असल्यास त्यांना वेळीच सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाºयांना दिले. अहेरी विभागातील फार कमी शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.अर्ज भरताना बºयाचवेळा नेट कनेक्टीव्हीटीची समस्या निर्माण होत असल्याने अर्ज भरण्यास विलंब होत आहे. ही बाब पाचही तहसीलदारांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. तहसीलदारांनी चालू खरीप हंगामासाठी कर्ज मंजूर प्रकरणे, कर्जाचे वाटप, कापूस व भात पिकाची सरासरी लागवड, पावसाची टक्केवारी आदी बाबींची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
कर्जमाफीचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:18 IST
अहेरी उपविभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यातीलही तहसीलदारांकडून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम....
कर्जमाफीचा घेतला आढावा
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : मुदत संपण्यापूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा