शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू

By admin | Updated: November 10, 2014 22:44 IST

आष्टी- इल्लूर मार्गावर राहत असल्याने श्वेता चांगदेव बोरकर या दहा वर्षीय मुलीचा शेतातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

आष्टी : आष्टी- इल्लूर मार्गावर राहत असल्याने श्वेता चांगदेव बोरकर या दहा वर्षीय मुलीचा शेतातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. श्वेता बोरकर ही सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घरालगत असलेल्या शेतात शौचास गेली. सदर शेतात जेसीबीने काही दिवसांपूर्वीच मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात श्वेताचा पाय घसरल्याने तिचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. श्वेता सायंकाळ होऊनही घराकडे परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरू केले असता तिचा मृतदेह खड्ड्यात पडला असल्याचे आढळून आले. सायंकाळी ६ वाजता मृतदेह खड्ड्यातुन काढण्यात आला. घटनेच्या दिवशी तिचे आईवडील दोघेही बाहेरगावी तेरवीच्या कार्यक्रमाला गेले होते. घरी तिघी बहीणी होत्या. बहिणींनी तिचा शोध घेणे सुरू केले. मयत श्वेता ही सर्वात लहान बहिन असून ती जिल्हा परिषद शाळा इल्लूर येथे चवथ्या वर्गात शिकत होती. तिचे वडील पेपर मिलमध्ये रोजंदारी कामावर आहेत. श्वेताच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्वेताच्या वडीलांची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शेतात जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्याला परवानगी सदर शेतमालकाने घेतली होती काय? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्वेताच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)