शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मातेच्या पोटातच बाळाचा मृत्यू

By admin | Updated: May 18, 2016 01:38 IST

प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात ४ एप्रिल रोजी भरती झालेल्या अहेरी येथील रंजिता संतोष दोंतुलवार या महिलेची ४२ दिवस उलटूनही सिजर करण्यात आले नाही.

४३ दिवस रूग्णालयात भरती : दोषींवर कारवाईची छाया कुंभारे यांची मागणी; चौकशी समिती नेमलीगडचिरोली : प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात ४ एप्रिल रोजी भरती झालेल्या अहेरी येथील रंजिता संतोष दोंतुलवार या महिलेची ४२ दिवस उलटूनही सिजर करण्यात आले नाही. त्यामुळे बालकाचा सोमवारी रात्री १०.३० वाजता पोटातच मृत्यू झाला व मातेची तब्येतही गंभीर आहे. यासाठी जबाबदार असलेल्या डॉ. किलनाके यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सदस्य छाया कुंभारे यांनी केली आहे. रंजिता संतोष दोंतुलवार ही ३२ वर्षीय महिला जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रसूतीसाठी भरती होती. मात्र ४२ दिवस उलटूनही तिच्यावर उपचार करण्यात आले नाही. सिजर करण्यासाठी तिला सतत तीन दिवस उपाशी ठेवण्यात आले. मात्र सिजर केले नाही. डॉ. किलनाके यांनी रंजिताची सोमवारी रात्री १०.३० वाजता तपासणी केली व बाळ पोटातच मृत्यू पावल्याचे घोषीत केले. त्याचवेळी रंजिताची बीपी वाढल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जि.प. सदस्य छाया कुंभारे यांनी मंगळवारी दुपारी ११ वाजता रूग्णालयाला भेट दिली. रंजिताच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्याकडे केली. डॉ. रूडे यांनी डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. शेंद्रे व डॉ. मेश्राम यांचा सहभाग असलेल्या चौकशी समितीच्या मार्फतीने चौकशी केली जाईल. ही समिती दोन दिवसात आपला अहवाल सादर करेल व सदर अहवाल कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविला जाईल, असे आश्वासन दिले. (नगर प्रतिनिधी)