शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:37 IST

प्रबळ इच्छाशक्ती, पत्नी, मुलगी आणि मित्रांनी दिलेली हिंमत व धीर यामुळेच जगण्याचे बळ मिळाले.... सतरा दिवस व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर ...

प्रबळ इच्छाशक्ती, पत्नी, मुलगी आणि मित्रांनी दिलेली हिंमत व धीर यामुळेच जगण्याचे बळ मिळाले....

सतरा दिवस व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर राहिलेल्या ठाणेगाव येथील देवानंद बोरकर यांनी केली कोरोनावर यशस्वी मात

महेंद्र रामटेके

आरमोरी : ‘पप्पा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकर घरी परत या... मी तुमची वाट बघत आहे!’ सर्व परिस्थिती विपरीत दिसत असतानाही मुलीची ती आर्त हाक त्यांना जगण्याची नवी उमेद देत होती. आपल्याला जगायचे आहे, निदान कुटुंबासाठी तरी आपण जगलोच पाहिजे, असा ठाम निश्चय त्यांनी मनाशी केला आणि तब्बल १७ दिवस कोरोनाशी लढा देऊन विजयी मुद्रेने ते घरी परतले.

ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. बोरकर यांना सुरुवातीला साधा सर्दी व ताप आला होता. त्यांनी गोळ्या घेऊन प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ब्रह्मपुरी येथे रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेथील खासगी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास वाटला नाही. परंतु दुसऱ्या दिवसापासून श्वसनाचा त्रास वाढू लागला. ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागली.

डॉक्टरांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांनी गडचिरोली किंवा नागपूरला उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ब्रह्मपुरी येथून बोरकर यांना गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा सिटी स्कोअर वाढून १८ वर तर ऑक्सिजन लेवल ७० वर आली होती. आयसीयूमध्ये त्यांना भरती केले तेव्हा ते भीतीने खचून गेले. नागपुरात बेड उपलब्ध नसल्याने भंडारा येथे विचारणा केली, पण बोरकर यांची स्थिती पाहून डॉक्टरांनी ९५ टक्के हमी नसल्याचे सांगत भरती करून घेण्यास नकार दिला. केवळ कुटुंबीयांच्या इच्छेखातर दवाखान्यात भरती करून घेतलेल्या बोरकर यांनी औषधांपेक्षाही सकारात्मक विचार आणि मानसिक आधाराच्या जोरावर कोरोनावर मात केली.

(बॉक्स)

पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आला

भंडाऱ्यातील डॉक्टरांनी भरती करण्यास नकार दिल्यानंतरही बोरकर यांच्या पत्नीने खचून न जाता मोठ्या हिमतीने डॉक्टरांना केवळ ५ टक्के हमी घ्या आणि उपचार सुरू करा, ५ टक्के माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी विनवणी केली. त्यामुळे उपचार सुरू झाला. ९ दिवस व्हेंटिलेटर व ८ दिवस ऑक्सिजनवर अशा कठीण परिस्थितीत त्यांचा एक-एक दिवस मागे पडत होता. डोळ्यांसमोर मृत्यू बघत होतो, मात्र या परिस्थितीत पत्नीने दिलेली हिंम त, मुलीने फोनवरून वेळोवेळी घातलेली साद, मित्रमंडळींनी दिलेला धीर, विश्वास व आधार यांनी अँटिबॉडीचे काम केले आणि प्रबळ इच्छाशक्ती व आत्मबल जागृत होऊन सकारात्मकपणे जगण्याची नवी उमेद मिळाली. त्यामुळे कोरोनावर विजय मिळवू शकलो, असे देवानंद बोरकर सांगतात.

-----

आप्तस्वकियांकडून हिंमत मिळणे गरजेचे

ऑक्सिजन पातळी खालावलेले अनेक रुग्ण केवळ भीतीने घाबरून मृत्यूच्या दाढेत पोहोचतात. अशा स्थितीत त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील व मित्र परिवारातील लोकांनी त्यांच्यापासून दूर न जाता त्यांना हिंमत, धीर व आधार दिल्यास नक्कीच कोरोनावर यशस्वी मात करता येते, याचे उदाहरण म्हणजे ठाणेगाव येथील देवानंद बोरकर ठरले आहेत.