शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

काळीपिवळी टॅक्सीतून सिलिंडरची वाहतूक

By admin | Updated: August 22, 2016 02:19 IST

चालत्या वाहनात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने शिक्षेची तरतूद आहे. शासनाने मानवाच्या सुरक्षिततेसाठी कायदे बनविले असले ...

प्रवाशांचा जीव धोक्यात : पोलीस व आरटीओ विभागाचा कानाडोळादेसाईगंज : चालत्या वाहनात धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने शिक्षेची तरतूद आहे. शासनाने मानवाच्या सुरक्षिततेसाठी कायदे बनविले असले तरी या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा प्रकार देसाईगंज शहरात दिसून येत आहे. काळीपिवळी टॅक्सी प्रवासी वाहनातून गॅस सिलिंडरची वाहतूक होत असल्याने प्रवाशांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलीस विभागासह आरटीओ विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. देसाईगंज-कुरखेडा मार्गावर काळीपिवळी टॅक्सीतून सिलिंडरची वाहतूक होत असल्याचे दिसून येते. देसाईगंज येथून कुरखेडा, कोरची तालुक्यात गॅस भरलेल्या ज्वलनशिल सिलिंडरची वाहतूक काळीपिवळी टॅक्सीतून सर्रास केली जात आहे. देसाईगंज येथील पटेल कॉम्प्लेक्स परिसरातील दुकानदारांनी काळीपिवळी टॅक्सी चालकांना यासंदर्भात सूचना दिली. प्रवासी व सिलिंडरने भरलेल्या टॅक्सी वाहन दुकानाच्या समोर उभ्या करू नका, अशी ताकीद दिली. मात्र संबंधित काळीपिवळी टॅक्सी चालक दुकानदाराचे म्हणणे समजून न घेता उलट दुकानदारांशी हुज्जत घालत असल्याचे चित्रही दिसून आले. येथून ५० फूट अंतरावर उभा असलेल्या वाहतूक पोलीस शिपायाने याबाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. प्रवाशांची वाहतूक करीत असलेल्या काळीपिवळी टॅक्सी वाहनातील ज्वलनशिल सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता अधिक असते. मात्र या साऱ्या बाबींकडे काळीपिवळी टॅक्सीचालक पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. आर्थिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने देसाईगंज शहरात गॅस सिलिंडरची वाहतूक करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भंगार टॅक्सी वाहतुकीवरदेसाईगंज शहरातून लगतच्या प्रमुख चार मार्गावर काळीपिवळी टॅक्सीने प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र यातील अनेक काळीपिवळी टॅक्सी भंगार झाल्या असून गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या जीर्ण टॅक्सीने प्रवासी वाहतूक केली जात आहे. अशा टॅक्सीमधूनसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी जनावरांप्रमाणे कोंबून वाहतूक केली जात आहे. अनेक टॅक्सीचे छतही पूर्णत: खराब झाले आहे. टॅक्सीचालकांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत आहे.