शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

By admin | Updated: September 8, 2014 01:21 IST

शहरातील भगतसिंग वार्डातील एका चार वर्षीय अल्पवयीन बालिकेवर याच वार्डातील एका ३२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची ...

देसाईगंज : शहरातील भगतसिंग वार्डातील एका चार वर्षीय अल्पवयीन बालिकेवर याच वार्डातील एका ३२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार भगतसिंग वार्डातील चार वर्षीय बालिका आपल्या घरासमोरील परिसरात खेळत होती. दरम्यान या बालिकेला एकटीच पाहून वामन पगाडे ३२ या नराधमाने वस्तू देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या पीडित बालिकेच्या पालकांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात केली. या घटनेसंदर्भात तपासचक्र फिरवीत पोलिसांनी या आरोपीवर बाल सुरक्षा कायद्यांतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला. सदर घटना चार दिवसापूर्वी घडली असल्याची चर्चा आहे. पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. अटक केलेल्या वामन पगाडे या आरोपीला देसाईगंज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास देसाईगंजचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे करीत आहे. शरमेने मान खाली घालविण्यास लावणाऱ्या या घटनेमुळे देसाईगंज शहरात खळबळ माजली आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक करीत आहे.(वार्ताहर)