शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी भेंडाळा केंद्रावर जिल्ह्याबाहेरील लोकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काहीसे असेच होत असल्याचे सध्या दिसत आहे. इतर जिल्ह्यातील लोकांमुळे भेंडाळा परिसरातील नागरिकांना लस घेण्याची तारीख मिळणे कठीण झाले आहे. कारण ऑनलाईन प्रक्रियेमघ्ये स्पष्ट दाखवत आहे की, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी १३ तारखेपर्यंत शेडयुल्ड पॅक आहे. त्यामुळे अनेक स्थानिक लोक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत सध्या  आहेत.

ठळक मुद्देऑनलाईनमुळे बाहेरच्यांना लाभ, स्थानिक नागरिक प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात मागील चार ते पाच दिवसांपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व ४४ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे त्यात स्थानिक नागरिकांपेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावेळी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचा फज्जा उडण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या हक्काची लस दुसऱ्यांना मिळत आहे. याठिकाणी गर्दी करणाऱ्या नागरिकांमध्ये बहुतांश लोक हे बाहेरील जिल्ह्यातून म्हणजे नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातूनही आले आहेत. त्यामुळे भेंडाळा परिसरातील स्थानिकांना या लसीकरणाचा कितपत फायदा होईल? असा प्रश्न निर्माण होत आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे कुठलाही व्यक्ती, कोणत्याही जिल्ह्यातील असला तरी त्याने जर आपले नाव नोंदविले आणि त्याला लसीकरणाची तारीख मिळाली तर तो त्या केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतो. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्या व्यक्तीला लस देणे भाग पडते. भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काहीसे असेच होत असल्याचे सध्या दिसत आहे. इतर जिल्ह्यातील लोकांमुळे भेंडाळा परिसरातील नागरिकांना लस घेण्याची तारीख मिळणे कठीण झाले आहे. कारण ऑनलाईन प्रक्रियेमघ्ये स्पष्ट दाखवत आहे की, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी १३ तारखेपर्यंत शेडयुल्ड पॅक आहे. त्यामुळे अनेक स्थानिक लोक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत सध्या  आहेत. भेंडाळा परिसरात पाहिजे त्या प्रमाणात ऑनलाईन वर्क करण्याच्या सोयी नसल्याने आणि अजूनपर्यंत या लोकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणाबाबत जनजागृती झाली नसल्याने बऱ्याच नागरिकांनी  अजूनपर्यंत   या वेबसाईटवर आपले नावच नोंदवलेले नाही. त्यामुळे स्थानिकांना डावलून इतर जिल्ह्यातील लोक या केंद्रामध्ये लसीकरण करून घेत असल्याचे चित्र सध्या या केंद्रामध्ये आहे. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांचा हिरमोड होत असून, आम्हाला कधी लस मिळणार, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन योग्य ती भूमिका मांडावी, असे मत भेंडाळा परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.  

चंद्रपूर, नागपूरसह वर्धेतील नागरिकलसीकरणासाठी नाव  नोंदवलेले बाहेरील जिल्ह्यातील नागरिक हरणघाट मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करून भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी जात आहेत. त्यामुळे याठिकाणी भरपूर गर्दी होत आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतून नागरिक लस टोचण्यासाठी येथे येत असल्याने स्थानिकांना लस मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया असल्यामुळे ज्या व्यक्तीला जी तारीख लसीकरणासाठी मिळते त्याच तारखेला त्या व्यक्तीला लस देत असतो. तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातील असला तरी  त्याला लस द्यावी लागते. आतापर्यंत बाहेरील जिल्ह्यातील अनेक लोकांना आमच्या केंद्रामध्ये लस दिली गेली आहे.- डॉ. विजय साबणे, वैद्यकीय अधिकारी, भेंडाळा प्रा. आ. केंद्र

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या