शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दारू व तंबाखूमुक्त गाव निर्मितीसाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST

एटापल्ली : तालुक्यातील तुमरगुंडा येथे मुक्तीपथ अभियानातर्फे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून दारू व ...

एटापल्ली : तालुक्यातील तुमरगुंडा येथे मुक्तीपथ अभियानातर्फे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत चार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

दरम्यान गावात उद्भ‌वणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. पेसा कायदा, दारूबंदी कायदा, तंबाखूबंदी कायद्यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत दारू व तंबाखूमुक्त राहणे का आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी दारू व तंबाखूमुक्त गावाचे वचन दिले होते. त्याची वचनपूर्ती करणे. कोरोना काळात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यामुळे विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गावातून तंबाखू हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध दारूविक्री सुरु असल्यास त्यांना नोटीसच्या माध्यमातून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन करणे. दारूबंदी असून तंबाखूविक्री सुरु असल्यास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करणे. गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री बंद झाल्यास गावाचा विकास होणार, याचा लाभ ग्रामपंचायतला मिळणार, आदींबाबत तुमरगुंडा, कांदोळी, येमली, गुरूपल्ली येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत तुमरगुंडा ग्रामपंचायतचे सरपंच सविता गावडे, उपसरपंच लालसू कुलभेटी, सदस्य मनोज कोलामी, वनमाला कंगाली, ताराबाई गावडे, नंदकुमार गावडे, कर्मचारी अशोक गावडे, कांदोळी ग्रामपंचायतचे सरपंच झुरू मडावी, उपसरपंच जिनीबाई मडावी, सदस्य सविता उसेंडी, येमली ग्रामपंचायतचे सदस्य माधुरी अलाम, गुरुपल्लीचे उपसरपंच बाळू आत्राम आदी सहभागी झाले होते. उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांना मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी मार्गदर्शन केले. आभार संदीप तलांडे यांनी मानले .