ऑनलाईन लोकमतगडचिरोली : स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत छत्रपती शाहूनगर प्रभागात तसेच स्वामी विवेकानंद नगरात लोकसहभागातून नगरसेवकांनी स्वच्छता मोहीम नुकतीच राबविली. यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी रस्त्यावर व खुल्या परिसरात झाडू लावून स्वच्छता केली.यावेळी शाहूनगर व विवेकानंद नगरातील नागरिकांना स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण कमी होते. घरी व परिसरात स्वच्छता ठेवल्यास विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची माणसाला लागण होत नाही. स्वच्छता पाळल्यास मलेरियासारखा रोग होत नाही, असे न.प. पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले. सदर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी शाहूनगर प्रभागाचे नगरसेवक सतीश विधाते व नगरसेविका लता लाटकर यांनी पुढाकार घेतला. स्वच्छता मोहीमेत नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, तसेच देवाजी लाटकर, जीवन गोडे, राकेश रत्नावार, महेंद्र बुरे, प्रा. अनिल बारसागडे, उषा बन्सोड, वसंत सातपुते, खोब्रागडे, रमेश पाथर्डे, हरिदास गेडाम, बोबाटे, भगवान गेडाम, राजू भारती, बांबोळे आदीसह वार्डातील नागरिक उपस्थित होते.अस्वच्छता, घंटागाडी व नाली रस्ते आदीबाबतच्या समस्या असल्यास वार्डातील नागरिकांनी थेट नगरसेवक तसेच प्रशासनाकडे मांडाव्यात, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
नगरसेवकांनी केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:10 IST
स्वच्छ भारत अभियान (शहरी) अंतर्गत छत्रपती शाहूनगर प्रभागात तसेच स्वामी विवेकानंद नगरात लोकसहभागातून नगरसेवकांनी स्वच्छता मोहीम नुकतीच राबविली. यावेळी पालिका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी रस्त्यावर व खुल्या परिसरात झाडू लावून स्वच्छता केली.
नगरसेवकांनी केली स्वच्छता
ठळक मुद्देविवेकानंदनगरात उपक्रम : झाडू लावून कचऱ्याची विल्हेवाट,स्वच्छता ठेवण्याचे आवाहन