शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेचेअभावी कोरोनाचा रुग्ण सहा तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:35 IST

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने येथील कोविड सेंटर डिसेंबर महिन्यात बंद करण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या सर्व रुग्णांना ...

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने येथील कोविड सेंटर डिसेंबर महिन्यात बंद करण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या सर्व रुग्णांना आता गडचिरोली येथे पाठवण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज सकाळी ११ वाजता तपासणी केली जाते. नेहमीप्रमाणे दि.२७ रोजी सकाळी रुग्णांची तपासणी केली असता एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गडचिरोली येथील ॲम्बुलन्स प्रमुखांना ११.३० वाजता रुग्णाची माहिती देऊन गाडीची मागणी केली. त्यांनी रुग्णांची माहिती घेतली व गाडी पाठवतो असे सांगितले. परंतु अनेकदा फोन करूनही गाडी लवकर आली नाही. ११ वाजतापासून रुग्णवाहिकेअभावी तो रुग्ण रुग्णालयाच्या आवारात ताटकळत असल्याची माहिती लोकमतला मिळाली. सदर प्रतिनिधीने रुग्णालयाला भेट देऊन विचारपूस केली असता धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमधील एका ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांना रुग्णालयाच्या आवारात बसून राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे जेवणसुद्धा झाले नव्हते. त्यांच्याजवळ कोणीही जात नव्हते.

सदर रुग्णाने भूक लागल्यानंतरही बाहेर न पडण्याचे सौजन्य दाखविले, अन्यथा ते बाहेर गेले असते तर कोरोना पसरण्याची शक्यता होती. या अगोदरही असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. कोरोना रुग्णाबाबत आरोग्य विभागाकडून अशा प्रकारचे दुर्लक्ष होत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, आणि असा प्रकार यापुढे होऊ नये यासाठी धानोरा येथे कोविड केअर सेंटर देण्यात यावे किंवा धानोरा येथे रुग्णवाहिकेची सोय करावी, अशी मागणी होत आहे.