शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना सरकारी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:38 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे स्थानिक नागरिकांनी कोविडसंदर्भात शासनाला सहकार्य करण्यासाठी देणगी स्वरूपात जो निधी जमा केलेला आहे त्या निधीतून ...

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे स्थानिक नागरिकांनी कोविडसंदर्भात शासनाला सहकार्य करण्यासाठी देणगी स्वरूपात जो निधी जमा केलेला आहे त्या निधीतून अशा अनाथ बालकांना मदतीचा हात देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देणगी स्वरूपात आलेल्या निधीतून ३ लाख ६० हजार ७५७ रुपयांचा निधी अनाथ व एक पालक गमावलेल्या बालकांना सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात आला. दोन्ही पालक गमावलेल्या १० बालकांना प्रतिबालक १० हजार ५५५ रुपये, तर एक पालक गमावलेल्या (आई किंवा वडील) १०२ बालकांना प्रत्येकी २५०१ प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला. त्यातील निवडक बालकांना जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

लाभार्थी बालक आणि नातेवाइकांसोबत जिल्हाधिकारी सिंगला यांनी‍ सविस्तर चर्चा केली. त्यांना काही अडचण असल्यास प्रत्यक्ष माझ्यासोबत तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याची सूचना त्यांनी केली. आपल्या सर्वासोबत शासन सक्षमपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण परांडे, समिती सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अविनाश गुरुनुले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, उज्ज्वला नाकाडे, संरक्षण अधिकारी मनेश्वर कंरगामी, क्षेत्र कार्यकर्ता नीलेश देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.