शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शिक्षण झाले ढकलगाडी; शाळेविना कागदोपत्री पास हाेतेय पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

चामाेर्शी तालुक्याची लोकसंख्या एक लाख ७९ हजार १२० (२०११च्या जनगणनेनुसार) आहे. तालुक्यात २०४ गावे आहेत. ७५ ग्रामपंचायती व ...

चामाेर्शी तालुक्याची लोकसंख्या एक लाख ७९ हजार १२० (२०११च्या जनगणनेनुसार) आहे. तालुक्यात २०४ गावे आहेत. ७५ ग्रामपंचायती व एका नगरपंचायतीचा समावेश आहे. तालुक्यात इयत्ता पहिली ते १२वीपर्यंत एकूण २८० शाळा व महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या १९६ व ३ शासकीय आश्रमशाळा असे १९९ व खासगी व्यवस्थापनाच्या ८१ खासगी अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांचा समावेश आहे. आज ज्यांची मुले लहान आहेत, ती घरात राहून मोठी होत आहेत; पण बालपण न भोगता शाळेत न जाता वाढलेली ही मुले मोठी होतील तरी कशी? आज शाळेविना कागदोपत्री उत्तीर्ण झालेली ही पिढी जीवनाच्या प्रश्नांची उत्तरे कागदातच शोधू लागली, तर व्यवहाराच्या मैदानात झिरो मिळून त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही का? असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे.

आज अ, ब, क, ड आणि ए, बी, सी, डी न शिकता थेट पुढच्या वर्गात जाणारे चिमुकले आता आठवीपर्यंत तसेच ढकलत नेले जाणार आहेत. त्यांपैकी पुढे काही मुले अभियंते घडतील, काही डॉक्टर घडतील; तर काही राजकारणात जातील. हे अर्धवट ज्ञानी स्वत:सह साऱ्या समाजाचे नुकसान करतील. कोरोनामुळे तालुक्यातील हजारो मुले नर्सरीत पाऊल न ठेवताही केजी-१ मध्ये दाखल होणार आहेत. हजारो विद्यार्थी केजीमध्ये न जाता थेट पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत. पहिल्या वर्गात जाण्यापूर्वी चिमुकल्यांना शालेय जीवनाची तोंडओळख व्हावी, हा पूर्वप्राथमिक शिक्षणाचा उद्देश आहे. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा आणि नर्सरीचे वर्ग भरले नाहीत. तिसऱ्या लाटेचा धाेका असल्याने चालू शैक्षणिक सत्र जसे कोरे राहिले; तसेच २०२१-२२ हेही वर्ष शाळेविना राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स

कायदा ठरला अडसर

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना वयानुसार संबंधित वर्गात दाखल करावे लागते. यंदा पहिलीचे विद्यार्थी वर्षभर शाळेत गेले नसले तरी पुढच्या सत्रात दुसऱ्या वर्गात बसविणे आवश्यक आहे. आरटीईच्या तरतुदीनुसार ही बाब अपरिहार्य असली तरी विद्यार्थ्यांना एक अक्षर न शिकविता त्याची प्रगती झाली, असे गृहीत धरणे याेग्य हाेणार नाही. चिमुकल्याचे आज झालेले शैक्षणिक नुकसान कधीच भरून निघणार नाही. त्यांचे आजचे शिकण्याचे वय निघून गेल्यावर पुन्हा त्यांना ‘त्या’ वर्गात शिकण्याची संधी नाही.