शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

गरज नसलेल्या ठिकाणी झाले बांधकाम

By admin | Updated: June 18, 2014 00:13 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या

सरकारी निधीचा अपव्यय : ५०० मीटरच्या अंतरात बांधले १३ कलवटगडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या रस्त्यात १३ कलवटाचे बांधकाम करण्यात आले. एवढ्या बांधकामाची गरज नसतानाही हे काम करण्यात आला आहे. यामध्ये केवळ पैसे खाणे यासाठीच हे काम झाले. हे अगदी सूर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट आहे. या कामाची जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी विशेष बाब म्हणून चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी हेमलकसाच्या ग्रामस्थांनी केली आहे. भामरागड या दुर्गम तालुक्यात भामरागड-आलापल्ली मार्गावर हेमलकसा गावापासून ५०० मीटर अंतराच्या रस्त्यात १३ कलवट (मोरी) बांधकाम मंजूर करण्यात आले होते. जुने चार कलवट (मोरी) असताना आता नव्या ९ मोरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदर ठिकाणी एकही नाला नाही. पावसाळ्यात पाणी वाहते अशीही परिस्थिती नाही. मग कलवट बांधायचे कशाला? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी बांधकाम प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच उपस्थित केला होता. याबाबत लोकमतने ७ मार्च २०१४ ला नागरिकांच्या माहितीनुसार वृत्तही प्रकाशित केले होते. भामरागड ग्रामपंचायत अंतर्गत हेमलकसा गावाच्या मुख्य मार्गावरून पोच रस्त्यावर ५०० मीटर अंतरात चार कलवट असताना पुन्हा ९ कलवट बांधण्याचे नियोजन करण्यात आले व गावच्या ग्रामपंचायतीने विरोध केलेला असताना हे बांधकाम रेटून पूर्ण करण्यात आले. हे कलवटाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. रस्त्यापेक्षा कलवट उंच झाले आहे. त्याच्यावरून वाहन जाणे अडचणीचे होत आहे. सायकलही जाऊ शकत नाही. गरज नसलेल्या ठिकाणी १३ कलवटे बांधून ठेवण्यात आल्यामुळे या कामात सरकारचा लाखो रूपयाचा निधी खर्च झाला आहे. या निधीतून संपूर्ण हेमलकसा गावात सिमेंट रस्ते करता आले असते. परंतु कलवटाचे बांधकाम करण्यात आले. गरज नसतानाही झालेल्या कामाचे बील काढण्यासाठी आता कंत्राटदाराची धावपळ सुरू आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे. कामाची मागणी नसताना हे कलवटाचे १३ कामे का करण्यात आले, असा ग्रामस्थांचा सवाल आहे. या संदर्भात २४ फेब्रुवारीला भामरागड ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आलापल्ली येथे पत्र देऊन कलवटाचे काम बंद करा, असे सांगितले. परंतु बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राची दखलही घेतलेली नाही, हे विशेष.