शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:42 IST

तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सातपुती गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुटेकसा येथील सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम निधीअभावी रखडले आहे. ३०० मीटर पैकी केवळ ६० मीटरचे काम दोन वर्षात पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देगुटेकसा येथील रस्ता : दोन वर्षात केवळ ६० मीटरचे काम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सातपुती गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुटेकसा येथील सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम निधीअभावी रखडले आहे. ३०० मीटर पैकी केवळ ६० मीटरचे काम दोन वर्षात पूर्ण झाले आहे. यावर जवळपास अर्धा निधी खर्च झाल्याने रस्त्याचे बांधकाम पूर्ण होणार की नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.गुटेकसा येथील अंगणवाडीजवळून मुख्य रस्त्यावरील हनुमान मंदिरापर्यंत जाणाºया रस्त्यावर जवळपास ३०० मीटरपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण डीपीसीअंतर्गत मंजूर झाले. याकरिता २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु आतापर्यंत संबंधित कंत्राटदाराला १२ लाख ३ हजार रूपये देण्यात आले, असे बांधकाम विभागाचे अभियंता बंदेलवार यांनी सांगितले. ३०० मीटरपैकी ६० मीटरपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. उर्वरित रस्त्याचे काम शिल्लक आहे. त्यामुळे दिलेल्या इष्टीमेटमध्ये रस्त्याचे काम पूर्ण होणार की नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मागील दोन वर्षांपासून या रस्त्याच्या कामात कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या ६० मीटरच्या रस्त्यासोबत उरलेल्या २४० मीटरपर्यंत मुरूम आणि गिट्टी टाकण्यात आली आहे. तसेच ड्रेनेजचे काम करण्यात आले आहे. शासकीय नियमानुसार प्रत्येक कामाचा कालावधी ठरलेला असतो. परंतु मागील दोन वर्षांपासून सदर रस्त्याचे काम रखडले आहे. प्रशासनाने सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत उदासीन आहेत. विशेष म्हणजे सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु दुर्लक्ष झाले. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे आवागमनासही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुर्लक्षामुळे यापुढील काम करण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे सदर कामासंदर्भात चौकशी करून रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना माजी पं.स.सदस्य हेमंता शेंडे, आसाराम शेंडे, भूमेश शेंडे, रंजना शेंडे, राकेश शेंडे, राहुल मांडवे उपस्थित होते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक