शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही बांधकाम तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST

गडचिराेली : संचारबंदीतही घरांचे बांधकाम व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गडचिराेली शहरात दरवर्षी घर बांधकामाच्या माध्यमातून शेकडाे ...

गडचिराेली : संचारबंदीतही घरांचे बांधकाम व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गडचिराेली शहरात दरवर्षी घर बांधकामाच्या माध्यमातून शेकडाे मजुरांना राेजगार उपलब्ध हाेतो. बांधकाम सुरू असल्याने मजुरांवर बेराेजगारीचे संकट आले नाही. केवळ रविवारी बांधकाम बंद ठेवले जाते.

बाजारपेठेत सकाळीच उसळते गर्दी

गडचिराेली : भाजीपाला व किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. केवळ चारच तास दुकाने सुरू ठेवता येत असल्याने दुकानदार सकाळी ७ वाजताच दुकाने उघडतात. तर, ग्राहकही ७ वाजताच दुकांनामध्ये पाेहाेचतात. १० वाजेपासून तर आठवडीबाजाराप्रमाणे गुजरी व बाजारपेठेत गर्दी उसळली असल्याचे दिसून येते.

पाणी शुद्धीकरण केंद्रातील टाकीचे काम अंतिम टप्प्यात

गडचिराेली : आठवडीबाजाराला लागून असलेल्या हनुमान वाॅर्डाला पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात पाण्याची टाकी बांधली जात आहे. या टाकीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हनुमान वाॅर्डवासीयांना पाण्याची सुविधा हाेईल, अशी अपेक्षा आहे.

सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांना सुरुवात

गडचिराेली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाला मागील आठ दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे बाजारपेठ सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहते. दुपारी या ठिकाणी गर्दी राहत नसल्याने काम करणे साेपे झाले आहे. संबंधित कंत्राटदाराला पुन्हा सहा मार्ग बनवायचे आहेत.

कैकाडी जमातीच्या नागरिकांना भूखंड देण्याची मागणी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घर बांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

टिपागड स्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष

काेरची : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे. शिवाय, येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या निर्माण केल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत हाेईल.

टाॅवर थ्रीजीचे मात्र फाेनही लागत नाही

वैरागड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिला जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.

वाकलेले खांब बदलविण्याचा मुहूर्त मिळणार काय

धानाेरा : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विद्युतखांब वाकलेले आहेत. त्यामुळे सदर खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत महावितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.

वीजतारांना रेटून बांधकाम धाेकादायक

देसाईगंज : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युततारांच्या अगदी जवळून इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत चालले आहे. अशा इमारतींमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

माेकाट जनावरांमुळे रहदारी बाधित

एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.

अरुंद पुलांमुळे पावसाळ्यात रहदारीचा प्रश्न कायम

गडचिरोली : ब्रिटिशकाळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर - आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत.

बाेथेडा भागात दारूविक्री

गडचिरोली : तालुक्याच्या आंबेशिवणी परिसरातील बाेथेडा भागात मागील काही वर्षांपासून दारूची अवैध विक्री सुरू आहे. त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहारी गेले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे पाेलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

टिल्लू पंप जप्त करा

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दिवसातून दोनदा नळपाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र, रामनगर, स्नेहनगर परिसरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या घरामधील नळातील पाणीप्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणीही मिळत नाही. त्यामुळे टिल्लू पंप जप्त करावे.