शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाॅकडाऊन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. ...

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लाॅकडाऊन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने यावर्षी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कसे करायचे, याबाबत अस्पष्टता कायम आहे. असे असतानासुद्धा शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार पुढे रेटला जात आहे. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न कायम आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणेच्या वतीने दरवर्षी दहावी, बारावीची बाेर्डाची परीक्षा आयाेजित केली जाते. बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा मार्चपासून सुरू हाेत असते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या दाेन्ही परीक्षा आटाेपतात. या दाेन्ही परीक्षांच्या तारखा ठरल्या व वेळापत्रकही जाहीर झाले हाेते. मात्र, जानेवारीच्या अखेरपासून काेराेना संसर्गाचे प्रमाण वाढले. दरम्यान, शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे सर्वच विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

काेट....

इयत्ता दहावीच्या निकालाबाबत शासनाकडून अस्पष्टता आहे. विद्यार्थ्यांना गुणदान कसे करायचे, हा प्रश्न कायम आहे. शासनाने प्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा तिढा साेडवावा, त्यानंतर अकरावी प्रवेशासाठीचे नियाेजन करावे.

- प्रा. देवानंद कामडी, शिक्षक

..............................

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने आवश्यक ती पावले उचलावी. दहावी निकालाबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करावे. शाळांना स्पष्ट सूचना देऊन हा विषय मार्गी लावावा.

- सुनील चंदनगीरवार, प्राचार्य

...............................

काेराेना महामारीच्या संकटाने यावर्षी शाळा तसेच अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवर परिणाम झाला. ऑनलाईनचा पर्याय पुढे आला असला तरी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अडचणीची ठरते. शासनाने दहावीच्या निकालाबाबत ठाेस निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढावा.

- विलास मगरे, शिक्षक

बाॅक्स......

अंतर्गत मूल्यमापन कसे हाेणार

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी शाळास्तरावरील अंतर्गत मूल्यमापन कसे करावे, हा प्रश्न कायम आहे. काेराेना संकटामुळे सर्व विद्यार्थी घरी बसून हाेते. ऑनलाईन अभ्यास व गृहपाठ झाला असला तरी सर्व विद्यार्थी यात समांतर भूमिकेत दिसले नाहीत. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.

बाॅक्स....

ग्रामीण भागासाठी ऑनलाईन सीईटी अडचणीची

शासनाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाऊ शकते. ही सीईटी परीक्षा ऑनलाईन झाली तर गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी अडचणीची ठरणार आहे.

बाॅक्स....

ऑफलाईन झाली तर काेराेनाचे काय?

इंटरनेट कनेक्टिव्हिटी व इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा शासनाच्या वतीने ऑफलाईन स्वरूपाची घेतली जाऊ शकते. ही परीक्षा ऑफलाईन झाल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा संपर्क एकमेकांशी येईल. परिणामी परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना काेराेनाची बाधा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स....

आयटीआय, तंत्रनिकेतन प्रवेशाचे काय?

इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत असतो. काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता आयटीआय व पाॅलिटेक्निक अभ्यासक्रम निवडण्यावर भर देतात. मात्र, इयत्ता दहावीचा निकाल नेमका काेणत्या पद्धतीने लावायचा, हे अजून स्पष्ट नसल्याने आयटीआय व तंत्रनिकेतनला प्रवेश कसा मिळणार, हा प्रश्न कायम आहे. या दाेन्ही अभ्यासक्रमांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असताे.

बाॅक्स...

काय म्हणते आकडेवारी

अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा - १३,१४८

शहरातील एकूण जागा - ३,२१८