शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे शिष्टमंडळ नगराध्यक्षांना भेटले

By admin | Updated: February 13, 2016 00:51 IST

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला अपुरा पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, बंद पथदिवे यासह विविध समस्यांना ....

आंदोलनाचा दिला इशारा : शहरातील विविध समस्यांवर झाली चर्चागडचिरोली : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला अपुरा पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, बंद पथदिवे यासह विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटी व गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ गुरूवारी नगर पालिकेत जाऊन नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांना भेटले. त्यांच्याशी शहरातील विविध समस्यांबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. दरम्यान शहरातील समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास काँग्रेसच्या वतीने नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी यावेळी दिला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांनाही भेटून निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ पालिका कार्यालयात गेले. मात्र मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे हे कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनाची प्रत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात उपस्थित कर्मचाऱ्यांमार्फत पाठविण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी पंकज गुड्डेवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष भावना वानखेडे, रजनिकांत मोटघरे, एनएसयुआयचे अध्यक्ष नितेश राठोड, विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, शंकरराव सालोटकर, प्रतिक बारसिंगे, तौफीक शेख, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, कुणाल पेंदोरकर, पालिकेचे पाणी पुरवठा सभापती नंदू कायरकर, नगरसेविका पुष्पा कुमरे, लता मुरकुटे, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी प्रतिभा जुमनाके, जावेद शेख, बासिद शेख, गौरव आलाम, जीवन कुत्तरमारे, केवलराम नंदेश्वर, कमलेश खोब्रागडे, हेमंत मोहीतकर, राकेश गणवीर, अमर दातारकर, रोहित सादुलवार, अमर नवघडे, आदित्य मडावी, वृषभ धुर्वे, अक्षय साखरकर, तुषार कुळमेथे, प्रफुल आचले, प्रदीप नुरेशीया, बालू मडावी, पौर्णिमा भडके, जितू मुनघाटे, काशिनाथ गुरनुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)निवेदनातील मागण्याशहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या तत्काळ निकाली काढण्यात यावी, इंदिरा गांधी चौकातील बंद असलेले वाहतूक दिवे तत्काळ सुरू करावे, इंदिरा नगर, रामनगर, विवेकानंदनगरातील नागरिकांना जमिनीचे पट्टे द्यावे, बोरमाळा नदी घाट मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, शहरातील सर्व वार्डात नियमित नाली स्वच्छता करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, नगर पालिका क्षेत्रातील ज्या भागात रस्ते, नाल्यांचा अभाव आहे. त्या ठिकाणी रस्ते व नाली बांधण्यात यावे.