शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कोसा उत्पादकांवर संक्रांत

By admin | Updated: January 14, 2015 23:07 IST

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या तीन जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून ढिवर समाजाचे जवळपास ३ हजार कुटुंब वंशपरंपरेने टसर कोसा उत्पादन करून आपला उदरनिर्वाह करीत आहे.

उत्पादन घटले : अवकाळी पाऊस व कडाक्याच्या थंडीचा परिणामवैरागड : पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या तीन जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून ढिवर समाजाचे जवळपास ३ हजार कुटुंब वंशपरंपरेने टसर कोसा उत्पादन करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. मात्र अस्मानी संकटामुळे यंदा रेशीम टसर शेती धोक्यात आली आहे. अवकाळी पाऊस व कडाक्याच्या थंडीमुळे यंदा कोसा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. टसर रेशीम एन्थेरिया माईविटा या किटकापासून प्राप्त होणारे रेशीम आहे. या प्रजातीच्या किटकाचे खाद्य अर्जुन, एन, बोर आदी झाडांची पाने आहेत. टसर अळी पूर्ण विकसीत होण्याच्या म्हणजे अंडी, अळी, कोष, फुलपाखरू आदींची निर्मिती होण्याच्या काळात अवकाळी पाऊस जिल्ह्यात बरसला. तसेच गेल्या महिन्याभरापासून जिल्हाभरात कडाक्याची थंडी पडत आहे. अशा वातावरणामुळे अंडीपूज तयार होत नाही. तसेच नवजात अळ्या बाहेर पडत नाही. अंडीपासून पतंग तयार होईलपर्यंतचा हा पंधरा दिवसांचा काळात योग्य नैसर्गिक वातावरण असणे आवश्यक आहे. मात्र थंडीमुळे कालावधी वाढून कोसाची अवस्था खुंटली, अशी माहिती कोसा उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील कोसा उत्पादक शेतकरी साधारणत: दोनवेळा पिके घेतात. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसा उत्पादन घेण्याच्या कालावधीत अवकाळी पाऊस बरसला. तसेच कडाक्याची थंडी, दाट धुके यामुळे कोसा उत्पादनात घट झाली, अशी माहिती मेंढेबोडी येथील कोसा उत्पादक मारोती कांबळे, ऋषी भोयर, पुंडलिक भोयर, रेवनाथ मेश्राम, सभा कांबळे, चरण मुंगीकोल्हे, पत्रू कोल्हे, तुळशीराम गेडाम आदी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. (वार्ताहर)