शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्रांचे काम पूर्ण करा

By admin | Updated: January 10, 2015 22:55 IST

अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.

गडचिरोली : अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. अनेकदा २ ते ३ दिवसांपर्यंत तो सुरळीत होत नाही. परिणामी शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रस्तावित नवीन ३३ के. व्ही. उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी गडचिरोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. आढावा बैठकीला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, जिल्हा विद्युत समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा विद्युत निरीक्षक प्रदीप चामट, गडचिरोली विभागाचे अधीक्षक अभियंता किशोर मेश्राम, प्रमोद पिपरे, जिल्हा सचिव भारत खटी, ग्राहक प्रतिनिधी सुधाकर येनगंधलवार, विलास भांडेकर, अनिल कुनघाडकर, रेखा डोळस, कार्यकारी अभियंता गावंडे, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता हिवरकर, कार्यकारी अभियंता निशांत किरोलीकर, सुनील बडवे, मनोहर बोदलवार उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील ३३ के. व्ही. उपकेंद्राकरिता पर्यायी विद्युत पुरवठा करण्यासंदर्भात तसेच नवीन ६६ के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजुर करणे, १३२ के. व्ही. विद्युत पुरवठ्याची माहिती यावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना तत्काळ विद्युत जोडणी करून अनधिकृत व्यक्तीद्वारे वीज दुरूस्तीचे काम करतांना झालेल्या विद्युत अपघाताची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना खा. नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रस्तावित विद्युत उपकेंद्राची कामे तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)