शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे वेळेत पूर्ण करा- नेते

By admin | Updated: December 31, 2014 23:24 IST

अतिदुर्गम, मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली विकास कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.

गडचिरोली : अतिदुर्गम, मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली विकास कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत विकास कामांचा आढावा घेताना अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या बैठकीत १० लाखांपर्यंतची कामे ई-निविदा प्रक्रियेतून वगळण्याचा ठराव पारित करण्यात आला. बैठकीला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रभू राजगडकर आदी उपस्थित होते. या बैठकीला अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याची बाब खासदार नेते यांनी आग्रहीपणे मांडली. बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविण्याच्या सूचनाही खासदार नेते यांनी यावेळी केले. घरकुलाचा लाभ गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मिळण्यासाठी सर्व पंचायत समितीच्या बीडीओंनी योग्य ती चौकशी करून घरकुलाचे प्रस्ताव तयार करावे, तसेच अतिवृष्टी व पुरामुळे घराचे पूर्णत: नुकसान झालेल्या नागरिकांना विशेष तरतूद करून त्यांना घरकूल मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही प्रकल्प अधिकाऱ्यांना केल्या. तसा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अविकसित व उद्योगविरहीत जिल्हा असल्याने येथील सुशिक्षित बेरोजगारांना व गरजू नागरिकांना काम मिळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी १० लाखांपर्यंतची कामे ई-निविदा प्रक्रियेतून वगळण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडे प्रयत्न करणार, असेही खासदार नेते यांनी बैठकीत सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)