शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कामातील अडथळ्यासाठी तक्रारी

By admin | Updated: July 8, 2017 01:17 IST

विकास सहकारी तांदूळ गिरणीतील विरोधी गटाचे लोक वेळोवेळी तक्रार करून कामात अडथळा निर्माण करीत आहेत.

 संचालकांचा आरोप : घोट येथील सहकारी तांदूळ गिरणीतील धान खरेदी प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क घोट : विकास सहकारी तांदूळ गिरणीतील विरोधी गटाचे लोक वेळोवेळी तक्रार करून कामात अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे संस्थेची बदनामीही होत आहे, असा आरोप संचालकांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. घोट येथील विकास सहकारी तांदूळ गिरणीत २१ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान धान विक्रीसाठी व धान विक्री न झाल्यास भरडाई या उद्देशाने विलास बुरे यांनी घोट येथील तांदूळ गिरणीत धान आणला. सायंकाळी तांदूळ गिरणी बंद असल्याने ट्रक खाली झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता विरोधकांनी पोलिसांना बोलावले. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापिका यांनी सदर माल कुणाचा आहे हे माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सदर शेतकऱ्याने संचालकांच्या वादात आपले नुकसान होईल म्हणून स्वत:चा धान परत नेला. ३० जूनपर्यंत धान खरेदी सुरू होती. विरोधक ढिवरू बारसागडे, मिलिंद दुधबावरे, शीला वैरागडे यांनी आपसापोटी व पदाधिकाऱ्यांच्या बदनामीसाठी असा प्रकार चालविला आहे, असा आरोप सत्ताधारी संचालकांनी केला आहे. विनाकारण तक्रार करून संस्थेच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे. सभागृह बांधकाम धान खरेदी केंद्र, कर्मचारी नियुक्ती, सिमेंट विक्री व्यवसायास त्यांच्या विरोध असून कोर्टात याच विषयावर विरोधकांनी प्रकरण दाखल केले. त्यांच्या विरोधात निकाल लागून सुध्दा राजकीय आकसापोटी संस्थेचे नुकसान करीत आहेत, असे संचालकांनी म्हटले. दुसरीकडे खोट्या तक्रारी करून शेतकरी व संस्थेचे पदाधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न संचालकांनी चालविला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विरोधी गटाने केली आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष वसंत दुधबावरे, मानद सचिव गुरूदास वैरागडे, संचालक अशोक पोरेड्डीवार, माजी सरपंच सुशील शहा, व्यवस्थापिका उपलटलवार, शेतकरी विलास बुरे आदी उपस्थित होते.